हिवाळ्यात सांधेदुखीने त्रस्त ? आहारात हे पदार्थ खा, आर्थ्रायटिसच्या लक्षणांपासून मिळेल आराम
काही पदार्थांच्या सेवनाने सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
नवी दिल्ली – आपली दिनचर्या आणि लाईफस्टाइलचा (lifestyle) आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीची जीवनशैली खूप धावपळीची अथवा तणावाची असेल तर त्यामुळे त्यांचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याही (physical and mental health) प्रभावित होते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या आजारामुळे किंवा आरोग्य समस्येने ग्रस्त असेल तर त्याच्याशी निगडीत लक्षणांमध्येही वाढ होते. अशीच एक आरोग्याची समस्या म्हणजे सांधेदुखी. (joint pain). थकवा, धावपळ आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आता केवळ वृद्धांनाच नव्हे तर तरूण व्यक्तींनाही कमी वयातच सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो.
त्याच वेळी, महिलाही अनेक वेळेस हाडं कमकुवत झाल्याची आणि सांधेदुखी होत असल्याची तक्रार करतात. खरंतर, शरीरात आवश्यक असलेल्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, हाडे आणि सांधे यांचे कनेक्टिव्ह टिश्यूज (connective tissues) कमकुवत होऊ लागतात. यामुळे सांधेदुखीचा त्रास फार वाढतो. त्याच वेळी, थंडीच्या दिवसात हा त्रास आणखी वाढल्याने काही लोकांना तो सहन करणे अतिशय कठीण होते.
थंडीमुळे हाडं दुखणं आणि सांधेदुखीचे प्रमाण खूप वाढते, त्यामुळे हाडांची घनता (bone density) वाढवणारे, हाडं मजबूत करणारे आणि शरीरातील सूज कमी करणारे असे पदार्थ काळजीपूर्वक निवडावेत. आयुर्वेदातही असे अनेक उपाय आणि आहाराच्या टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे सांधेदुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचे सेवन केल्याने सांधेदुखीच्या वेदना सुसह्य होतील.
थंडीच्या दिवसात सांधेदुखीपासून वाचण्यासाठी फॉलो करा या टिप्स
कॅल्शिअमयुक्त पदार्थ
कॅल्शिअम हा आपल्या हाडांतील मुख्य घटक आहे, म्हणूनच जेव्हा शरीराला कॅल्शिअम पुरेशा प्रमाणात मिळत नाही, तेव्हा हाडं कमकुवत होऊ लागतात आणि वेदना सुरू होतात. शरीरात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस हा आजारही होऊ शकतो आणि अनेक समस्याही वाढू शकतात. अशा परिस्थितीत पुरेशा प्रमाणात कॅल्शिअमच्या मिळावे यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याव्यतिरिक्त, तीळ, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या, अंडी आणि सुका अंजीर यांचे सेवन करावे.
व्हिटॅमिन डी
आपल्या शरीराद्वारे कॅल्शियमचे नीट शोषण व्हावे आणि त्याद्वारे हाडं आणि सर्व अवयवांचे पोषण व्हावे, यामध्ये व्हिटॅमिन डी हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जर शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत नसेल तर या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो आणि आपली हाडं कमकुवत होऊ शकतात. त्याचप्रमाणे सांधेदुखीचे प्रमाणही खूप वाढते, अतिशय वेदना होऊ लागतात. व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळावे यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता. त्याशिवाय खाली दिलेले पदार्थही खाऊ शकता.
– मशरूम – दूध व दही, चीज, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ – सोयाबीन – मासे व अन्य सीफूड
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)