वजन घटवण्यासाठी रात्रीचं जेवण करता स्किप ? मग संध्याकाळी खा ‘ हे ‘ पदार्थ
वजन कमी करण्यासाठी लोकं बरेच काही उपाय करत असतात. ही एक उत्तम ॲक्टिव्हिटी आहे. वजन कमी करण्यासाठी वर्कआऊटच्या वेगवेगळ्या कल्पना आणि महागडे डाएट प्लॅन्स असतात. वजन घटवणारे किटो डाएट, फास्टिंग यासारख्या अनेक नवीन पद्धती वापरुन पाहिल्या जातात.
वजन घटवण्यासाठी (weight loss) लोकं बरेच काही उपाय करत असतात. वजन कमी करण्यासाठी वर्कआऊटच्या (workout)वेगवेगळ्या कल्पना आणि महागडे डाएट (diet) प्लॅन्स असतात. वजन घटवणारे किटो डाएट, फास्टिंग यासारख्या अनेक नवीन पद्धती वापरुन पाहिल्या जातात. त्यापैकीच एक उपाय बरेच लोक करतात, तो म्हणजे रात्री जेवण न (skipping dinner) करणे. रात्री न जेवण्याचा सल्ला डॉक्टर आणि आहारतज्ज्ञही देत असतात, मात्र बराच काळ उपाशी राहणे, हे आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. वजन कमी करताना बराच वेळ उपाशी राहिल्याने चक्कर येते आणि अशक्तपणाही (weakness) वाटू लागतो. त्याशिवाय शरीरात पोषक तत्वांचा अभाव होतो. वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही रात्रीचं जेवण वगळत असाल तर संध्याकाळी काही पदार्थांचे सेवन करू शकता. हे पदार्थ हेल्दी तर असतातच, पण त्याचसोबत तुमचं पोटही बराच काळ भरलेलं राहील.
फायबरयुक्त पदार्थांचे करा सेवन : तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना त्यांचे वजन घटवायचे आहे किंवा जे लोक हे रुटीन फॉलो करतात, त्यांनी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. फायबरमुळे अशक्तपणा दूर होतो आणि बराच काळ पोट भरलेलं राहतं, त्यामुळे जास्त भूकही लागत नाही.
ओट्स टिक्की – ओट्समध्ये फायबर व्यतिरिक्त, इतर अनेक पोषक द्रव्ये देखील असतात. तुम्ही संध्याकाळी ओट्स टिक्की बनवून खाऊ शकता. ओट्स शरीरात फायबरचे प्रमाण योग्य प्रमाणात राखतात आणि यामुळे मेटाबॉलिज्म लेव्हलही योग्य राहते. ओट्स टिक्कीचं वैशिष्ट्य म्हणजे ती सहज पचते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नाश्त्यालाही ओट्स टिक्की खाऊ शकता.
क्विन्वा व्हेज उपमा – क्विन्वा हा फायबरचा उत्तम स्त्रोत मानला जातो. जर तुम्ही संध्याकाळी याचे सेवन केल तर तुम्हाला रात्रभर भूक लागणार नाही. त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे मेटाबॉलिक रेटही सुधारतो. वजन घटवण्यासाठी फॉलो करत असलेल्या दिनचर्येत तुम्ही क्विन्वा उपमाा खाऊ शकतात. त्यामधून केवळ फायबरच नव्हे तर अनेक व्हिटॅमिन्सही मिळतात.
पोह्याचे स्नॅक्स – रात्रीचे जेवण करायचे नसेल तर तुम्ही संध्याकाळी ड्राय पोहे स्नॅक्स खाऊ शकता. त्यासाठी एका कढईत थोडं ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यामध्ये पोहे घालून भाजावे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यामध्ये शेंगदाणेही घालू शकता. संध्याकाी एका ठराविक प्रमाणात तुम्ही याचे सेवन करू शकता.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)