शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले, या आजारावर आहे लाभदायक
शेंगदाण्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. शेंगदाण्याचे नेमके काय आहेत फायदे जाणून घेऊया
नवी दिल्ली : हल्ली बदललेली जीवनशैली आणि आहारामुळे लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या वाढत आहे. त्यामुळे हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. आहार आणि पोषण तज्ज्ञांच्या मते, सकस आणि पौष्टिक आहारामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. आहारात जर शेंगदाण्याचा समावेश केला तर हदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळणार आहे. जपानमधील लोकांवर केलेल्या संशोधनात हि बाब उघडकीस आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, शेंगदाण्याचा आहारात समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी शेंगदाणे प्रभावी आहे. जपानमधील लोकांवर केलेल्या संशोधनात हि बाब उघडकीस आली आहे. अभ्यासात आढळलेल्या परिणामांच्या आधारे असाही दावा करण्यात आला आहे की जे लोक रोज शेंगदाणे खातात. त्यांचे हृदय इतर लोकांपेक्षा निरोगी असते. याआधी अमेरिकेतील झालेल्या एका संशोधनातही शेंगदाण्याचे सेवन केल्याने हृदय मजबूत होते असे म्हटले होते.
अमेरिकन हार्ट असोसिएशन
या अभ्यासाचे निष्कर्ष ‘स्ट्रोक’ या अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. चला जाणून घेऊया हृदयरोग्यांसाठी शेंगदाणे कसे फायदेशीर आहे. शेंगदाण्यामुळे इस्केमिक स्ट्रोकचा धोका कमी होतो. शेंगदाण्याचा आहारात समावेश करून गंभीर समस्या टाळता येतात. इस्केमिक स्ट्रोक ही एक गंभीर आणि जीवघेणी समस्या आहे जी मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे निर्माण होते.
जपानच्या युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्राध्यापक आणि अभ्यासाचे प्रमुख सतोयो इकेहारा यांनी सांगितले की, अभ्यासात असे आढळून आले आहे की शेंगदाण्याचे सेवन केल्याने इस्केमिक स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे
हा अभ्यास जपानमधील 74 हजारांहून अधिक स्त्री-पुरुषांवर करण्यात आला. ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी शेंगदाण्याचे सेवन आणि हृदयविकाराचा धोका याचा अनेक स्तरांवरून अभ्यास केला. सर्व स्तरांवर केलेल्या तपासणीत शास्त्रज्ञांना असे आढळून आले की रोज 4-5 शेंगदाणे खाल्ल्याने इस्केमिक स्ट्रोकचा ( ischemic heart disease ) धोका 20 टक्क्यांनी कमी होतो. त्याच वेळी, सामान्य स्ट्रोकचा धोका 16 टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. शेंगदाण्यामुळे हृदयविकाराचा धोका 13 टक्क्यांनी कमी होतो.
हृदयविकाराचा धोका नैसर्गिकरित्या कमी होतो
शेंगदाण्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी एसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी एसिड, खनिजे, जीवनसत्त्वे आणि आहारातील फायबर असतात. हे सर्व पोषक खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात. तसेच उच्च रक्तदाब आणि क्रोनिक इंफ्लामेशन होण्याचा धोका कमी करू शकतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका नैसर्गिकरित्या कमी होतो.