नवी दिल्ली – थंडीच्या दिवसात बऱ्याच लोकांना पचनासंदर्भातील (indigestion problem in winter) अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठता (constipation) आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवल्या तर खूप अस्वस्थ वाटते. बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे व मलत्याग करताना त्रास होणे. सकस आहाराचा अभाव, पुरेसे पाणी न पिणे (drinking less water) आणि व्यायामाच्या अभावामुळे शरीराची नीट हालचाल न झाल्याने पोटाच्या या समस्या निर्माण होऊ शकतात.
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी आहारात काही बदल करावेत तसेच फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास अन्नाचे पचन होण्यास अडथळा निर्माण होत नाही. काही हेल्दी पदार्थांचे नियमितपणे सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
भिजवलेल्या मनुका
काळ्या मनुका या फायबरने समृद्ध असतात. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मनुका खाऊ शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात काही मनुका भिजवून ठेवाव्यात. सकाळी उठल्यावर मनुका चावून व्यवस्थित खाव्यात आणि पाणी पिऊन टाकावे. ह्या मनुका पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने पोटदुखीचा त्रास होत नाही.
मेथीच्या बिया
मनुक्यांप्रमाणेच तुम्ही भिजवलेल्या मेथीच्या बियांचेही सेवन करू शकता. रात्री झोपण्याआधी एक चमचा मेथीच्या बिया पाण्यात भिजवून ठेवाव्यात. तसकाळी उठल्यावर अंशपोटी या बिया नीट चावून सावकाश खाव्यात. किंवा तुम्ही मेथीच्या बियांची पावडरही सेवन करू शकता. रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीची पावडर घालून ते पाणी प्यावे.
आवळ्याची पावडर
आवळा पावडर ही पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा आवळ्याची पावडर कोमट पाण्यात घालून ते पाणी पिऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे केसगळतीही कमी होते. आवळा हा आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्यांपासून संरक्षण करण्याचे काम करतो.
गाईचं दूध
गाईचं दूध हे पचायला हलकं असतं त्यामुळे ते लहान मुले आणि वृद्धांसाठी खूप फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही एक ग्लास गाईचे दूध पिऊ शकता. त्यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. हे दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
गाईचं तूप
गाईच्या दुधाचं तूप हेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या तुपामुळे मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. गाईच्या तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असते. तसेच त्यामध्ये हेल्दी फॅट्सही असतात. यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.