Tomato Side Effects: तुम्हालाही टोमॅटो खायला आवडतात ? जाणून घ्या टोमॅटोच्या अतीसेवनाचे दुष्परिणाम
साधारणत: टोमॅटो हे आपलया आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासंदर्भात अनेतक समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो.
नवी दिल्ली– कोणताही गोष्ट अतिप्रमाणात करणं चांगलं नसतं असं म्हणतात. आपल्याला फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टीही प्रमाणाबाहेर केल्यास त्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो. खाद्यपदार्थांच्या बाबतीतही हा नियम लागू होतो. भाज्या आणि फळांचे सेवन आपल्यासाठी आरोग्यदायी (good for health) असते. पण प्रमाणाबाहेर त्या खाल्ल्यास त्यामुळे आपल्या आरोग्याला फायदा नव्हे तर नुकसानच होऊ शकते. यामध्ये टोमॅटोचाही (Tomato) समावेश आहे. आपल्या सर्वांनाच टोमॅटो खायला आवडतात, पण आहारात त्याचा गरजेपेक्षा अधिक समावेश केल्यास तब्येतीसाठी ते हानिकारक (side effects of tomato) ठरू शकते.
टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन सी, लायकोपीन आणि पोटॅशिअम यासारखी अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर तर असतात, पण काही वेळा यामुळेच आपल्याला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. टोमॅटोचे अतीसेवन केल्यास काय दुष्परिणाम होतात, हे जाणून घेऊया.
होऊ शकतो ॲसिडिटीचा त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-सी म्हणजेच एस्कॉर्बिक-ॲसिड याप्रकारची अनेक ॲसिड्स आढळतात. म्हणूनच टोमॅटो आम्लयुक्त आहे. तो जास्त प्रमाणात खाल्यास पोटात ॲसिडिटी होऊ शकते.
गॅसची समस्या निर्माण होऊ शकते
ज्या व्यक्तींना गॅसची समस्या असते, त्यांनी टोमॅटो जास्त खाणे टाळावे, कारण टोमॅटो ॲसिडिक असल्याने पोटात गॅस निर्माण होतो. मात्र टोमॅटोचे सेवन करताना त्यामध्ये काळे मीठ घातल्यास गॅसच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
किडनी स्टोन
ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, अशा लोकांनी टोमॅटो खाणे टाळले पाहिजे. खरंतर टोमॅटोच्या बियांमुळे तुमची स्टोनची समस्या खूप वाढू शकते. टोमॅटोचे सेवन करायचेच असेल तर आधी त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यानंतरच टोमॅटोचे सेवन करावे.