Health : चहा करताना ही गोष्ट टाका, डायबिटीज येईल नियंत्रणात, जाणून घ्या
चहा जितका भारी लागतो तितकेच या चहाचे शरीरासाठी अनेक फायदे देखील आहेत. तर आता आपण वेलचीच्या चहापासून शरीराला काय फायदे होतात याबाबत जाणून घ्या.
मुंबई : चहाशिवाय काहीजण राहू शकत नाही, लोकांना चहाचं एक व्यसनच लागलं आहे. त्यात पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये चहाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणालाच रहावत नाही. तसंच लोक कामाला जाताना, कुठेतरी बाहेर फिरायला जाताना किंवा आळस, कंटाळा आल्यानंतर चहाचा आस्वाद आवर्जून घेतात. त्यात वेलची घातलेला चहा असेल तर मन अगदी तृप्त होऊन जातं. वेलचीचा चहा जितका भारी लागतो तितकेच या चहाचे शरीरासाठी अनेक फायदे देखील आहेत. तर आता आपण वेलचीच्या चहापासून शरीराला काय फायदे होतात याबाबत जाणून घ्या.
तणाव कमी होतो – वेलचीचा चहा पिल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. तसंच वेलचीमध्ये काही असे घटक असतात जे आपला मेंदू सक्रिय करतात. तसंच हा चहा पिल्यानंतर तणाव कमी होण्यास मदत होते.
हृदय निरोगी राहते – वेलचीचा चहा हा आपल्या हृदयासाठी गुणकारी ठरतो. कारण वेलचीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि इतर पोषक तत्व आढळतात जे हृदयासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे वेलचीचा चहा हृदयासाठी गुणकारी असून हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पचनशक्ती सुधारते – वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे आपली पचनशक्ती मजबूत करतात. त्यामुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या निर्माण होत नाहीत. त्यामुळे वेलचीचा चहा नक्की प्या.
डायबिटीस नियंत्रणात राहते – वेलचीमध्ये काही असे पोषक तत्व आहेत जे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. वेलची इंसुलीन संवेदनशीलता नियंत्रित करते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांसाठी वेलचीचा चहा गुणकारी आहे.