Essential Oils for Period Cramps: मूड स्विंग आणि पीरिएड क्रॅम्प्सचा त्रास होईल दूर, फायदेशीर ठरते ‘हे ऑईल

मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक त्रास सहन करावे लागतात. पीरिएड क्रॅम्प्स आणि मूड स्विंगमुळे त्यांना अधिक त्रास होतो.

Essential Oils for Period Cramps: मूड स्विंग आणि पीरिएड क्रॅम्प्सचा त्रास होईल दूर, फायदेशीर ठरते 'हे ऑईल
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 3:06 PM

नवी दिल्ली – आजकाल इसेंशिअल ऑईलचा (essential oil) ट्रेंड वाढला आहे. घर सजवण्यासाठी आणि सुगंध पसरवण्यासाठी त्याचा वापर अनेक लोक करतात. विकाही लोक तणाव कमी करण्यासाठी देखील याचा वापर करतात. पण महिलांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. खरंतर इसेंशिअल ऑईल वनस्पतींमधून मिळविले जाते आणि म्हणूनच ते खूप प्रभावी मानले जाते. निरोगी त्वचा मिळवण्यापासून (healthy skin) ते पेटक्यांचा त्रास कमी करण्यापर्यंत इसेंशिअल ऑईल (use of essential oil) उपयोगी ठरते.

कोणते इसेंशिअल ऑईल प्रभावी आहे व त्याचा योग्य रितीने वापर कसा करावा, हे जाणून घेऊया

1) लॅव्हेंडर तेल

हे सुद्धा वाचा

इसेंशिअल ऑईल हे प्रत्येक वेलनेस किटमध्ये गरजेचे असतात. सूज कमी करण्यासाठी तसेच त्वचेला आराम मिळावा यासाठी लॅव्हेंडर तेल फायदेशीर ठरते. त्याशिवाय चिंता, फंगल इनफेक्शन आणि पीरिएडदरम्यान येणारे क्रॅम्प्स कमी करण्यासाठी ते खूप लाभदायक ठरते.

2) तुळशीचे तेल

चांगल्या गुणधर्मांनी भरलेल्याइसेंशिअल ऑईलच्या यादीत तुळशीचे तेलही महत्वाचे ठरते. थकलेल्या आणि तणावग्रस्त स्नायूंचा सामना करत असाल तर त्यांना आराम देण्यासाठी हे तेल उत्तम आहे. मायग्रेन सारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठीही हे तेल उपयोगी ठरते.

3) टी ट्री ऑईल

हे स्किनकेअर प्रेमींचे आवडते तेल आहे कारण यात सौंदर्याशी संबंधित प्रत्येक समस्येवर उपाय आहे. यासह, निरोगी आणि स्वच्छ त्वचेला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच ॲलर्जी आणि श्वसन समस्या हाताळण्यासाठी देखील प्रभावी ठरते.

4) क्लेरी सेज ऑईल

हे तेल हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते आणि मज्जातंतू शांत करण्यासाठी देखील प्रभावी ठरते. ताणतणाव आणि पचनक्रिया नीट करण्यासाठी हे तेल उपयुक्त ठरते.

5) पेपरमिंट तेल

या तेलामुळे थंडावा मिळतो. पेपरमिंट तेल केवळ नैसर्गिक ऊर्जाच वाढवत नाही, तर तुमच्या स्नायू आणि मज्जातंतूंनाही आराम देते. डोकेदुखीचा सामना करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे.

6) गुलाब तेल

गुलाब तेलाचा सुवास तर उत्तम असतोच पण तुमची सेल्फ-केअरसाठीही ते फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेला आराम तर मिळतोच पण पीरियड्स दरम्यान होणारी अस्वस्थाही कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते.

7) आल्याचं तेल

जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान क्रॅम्पचा सामना करावा लागत असेल, तर ते कमी करण्यासाठी आल्याचं तेल हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे चिंताही कमी होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.