Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : लसीकरणानंतरही ‘ओमिक्रॉन’ पोहोचवू शकतो तुम्हाला रुग्णालयात; उच्च रक्तदाब असलेल्यांनी राहा सतर्क!

उच्च रक्तदाब असलेल्या एखाद्याला कोविड-19च्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाल्यास, त्याला रुग्णालयात दाखल होण्याचा धोका दुप्पट होतो. त्या व्यक्तीला कोविड-19 लसीचे दोन्ही डोस तसेच बूस्टर डोस दिल्यानंतरही ही परीस्थिती त्याच्यावर येऊ शकते.

Corona : लसीकरणानंतरही ‘ओमिक्रॉन’ पोहोचवू शकतो तुम्हाला रुग्णालयात; उच्च रक्तदाब असलेल्यांनी राहा सतर्क!
रक्तदाब (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 7:12 PM

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासादरम्यान हे समोर आले आहे की, उच्च रक्तदाब (High blood pressure) असलेल्या एखाद्याला कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाल्यास, त्याला रुग्णालयात दाखल होण्याचा धोका दुप्पट असतो. हा अभ्यास डिसेंबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) कोविड-१९ संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या प्रौढांवर करण्यात आला. तपासादरम्यान, अशा रुग्णांवरही लक्ष ठेवण्यात आले, ज्यांना टाइप-2 मधुमेह, किडनीशी संबंधित आजार आणि हार्ट फेल सारख्या समस्या नाहीत. ज्या लोकांना फक्त उच्च रक्तदाबाचा त्रास होता, त्यांच्यामध्येही कोविड-19 च्या गंभीर संसर्गाचा परिणाम (Result of severe infection) दिसून आला. अमेरिकेतील अर्ध्याहून अधिक प्रौढांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. जोसेफ ई. एबिंगर, एमडी-एमएस, क्लिनिकल विश्लेषक संचालक आणि लॉस एंजेलिसमधील सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटर येथील श्मिट हार्ट इन्स्टिट्यूटमधील कार्डिओलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक यांनी ही तपासणी केली. त्यांच्या मते, अमेरिकेतील अर्ध्याहून अधिक प्रौढांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. त्यामुळे हा तपास अत्यंत महत्त्वाचा आहे.

दोन्ही डोस दिल्यावरही रुग्णालयात दाखल

महामारीच्या सुरुवातीस, कोविड-19 लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले तसेच संसर्गाच्या अनेक गंभीर लक्षणांपासून संरक्षण झाले. त्याच वेळी, इस्रायलमधील निरीक्षणात्मक अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोविड-19 लसीच्या बूस्टर डोसने गंभीर आजाराचा धोका 70 टक्क्यांनी कमी केला आहे. असे असूनही, लसीचे डोस आणि बूस्टर डोस दोन्ही दिल्यानंतरही, ओमिक्रॉन प्रकाराच्या पहिल्या लहरीदरम्यान काही लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

ओमिक्रॉनचे सात उप प्रकार

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, कोरोनाचे ओमिक्रॉन प्रकार यावेळी सर्वात प्रभावी आहे. डिसेंबर 2021मध्ये या प्रकाराचे पहिले प्रकरण यूएसमध्ये आढळून आले. त्याचवेळी, जुलै 2022पर्यंत Omicronचे सात उप-प्रकार प्राप्त झाले आहेत. काही, रुग्णांना तपासात ठेवण्यात आले होते, ज्यांनी कोविड-19 लसीचे दोन्ही डोस आणि बूस्टर डोस दिले होते. असे असूनही, एबिंगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोविड-19च्या गंभीर संसर्गामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागलेल्या रुग्णांचीही तपासणी केली.

हे सुद्धा वाचा

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी सतर्क राहावे

एबिंगरच्या म्हणण्यानुसार, डेटावरून असे दिसून आले आहे, की इतर कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त नसलेल्या वृद्ध लोकांनादेखील धोका असल्याचे दिसून आले आहे. जरी एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या दीर्घकालीन गंभीर आजाराने ग्रासलेली नसली तरी ती उच्च रक्तदाबाची बळी आहे, ओमिक्रॉन संसर्गामुळे कोणत्याही वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असू शकते.

काय आढळले संशोधनात?

संशोधनादरम्यान, रुग्णांची वय, लिंग, वंश, जात आणि क्लिनिकल डेटाच्या आधारावर इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदींमधून प्राप्त झालेल्या लोकसंख्याशास्त्रीय डेटासह तपासणी करण्यात आली. यादरम्यान, संशोधकांनी टाइप 2 मधुमेह, मूत्रपिंडाचा त्रास, हृदयविकाराचा झटका, हृदयविकार, क्रॉनिक पल्मोनरी ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज आणि अस्थमा यासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेगळे केले. आकडेवारीनुसार, mRNA COVID-19 लसीचे तीन डोस मिळालेल्या 912 लोकांपैकी सुमारे 16 टक्के लोकांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता होती. वाढत्या वय, उच्च रक्तदाब, किडनीचे गंभीर आजार, हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर आणि शेवटची लसीकरण आणि कोविड-19 संसर्गाच्या दरम्यानचा कालावधी यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका लक्षणीय वाढला आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या 145 रुग्णांपैकी 125 (86.2%) उच्च रक्तदाबाने त्रस्त होते.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.