Calcium: दुग्धजन्य पदार्थांविनाही मिळू शकते कॅल्शिअम, ‘या’ पदार्थांचे करा सेवन

Calcium: आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डेअरी प्रॉडक्ट्स अथवा दुग्धजन्य पदार्थ न खाताही इतर पदार्थांचे सेवन करूनही शरीराला आवश्यक तितक्या प्रमाणात कॅल्शिअम मिळू शकते. ते पदार्थ कोणते, हे जाणून घेऊया.

Calcium: दुग्धजन्य पदार्थांविनाही मिळू शकते कॅल्शिअम, 'या' पदार्थांचे करा सेवन
या पदार्थांनी मिळेल कॅल्शिअमImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 4:16 PM

Calcium:  कॅल्शिअम (Calcium) आपली हाडे आणि दात (bones and teeth) मजबूत ठेवण्याचे कार्य करते. त्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअमचं प्रमाण पूर्ण आहे की नाही हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

वयोमानानुसार (according to age) कॅल्शियमचे सेवन करावे, असे सांगितले जाते. तुम्ही 19 ते 50 वयोगटातील असाल तर तुम्हाला 2500 मिलीग्राम कॅल्शिअमची आवश्यकता असते. तर 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2000 मिलीग्राम कॅल्शिअमची आवश्यकता असते.

तज्ञांच्या सांगण्यानुसार, दुग्धजन्य पदार्थांमध्ये (dairy products) कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते, परंतु काही लोक व्हेगन (vegan) असतात. ते दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळतात. आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डेअरी प्रॉडक्ट्स अथवा दुग्धजन्य पदार्थ न खाताही इतर पदार्थांचे सेवन करूनही शरीराला आवश्यक तितक्या प्रमाणात कॅल्शिअम मिळू शकते. ते पदार्थ कोणते, हे जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

नाचणी

नाचणी हे एक नॉन-डेअरी प्रॉडक्ट आहे, ज्यामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते. नाचणी दळून ती गव्हाच्या पीठात ७: ३ या प्रमाणात मिसळून त्याचा वापर अन्न पदार्थांमध्ये करता येतो. याशिवाय तुम्ही ती (नाचणी) अंकुरित करूनही खाऊ शकता. नही खाऊ शकता. प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, फायबर, कर्बोदकांमधे अशा सर्व पोषक तत्वांनी समृद्ध, असलेली नाचणीचे सेवन केल्याने आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात.

तीळही  फायदेशीर

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ज्या लोकांना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे आवडत नाही, त्यांनी तीळाचे सेवन करावे. काळे किंवा पांढरे तीळ हे अशा लोकांसाठी कॅल्शिअमचा उत्तम पर्याय ठरू शकतत. त्याशिवाय या व्यक्ती तिळाच्या तेलात तयार केलेल पदार्थही खाऊ शकतात. 100 ग्रॅम तीळामध्ये सुमारे 975 मिलीग्राम कॅल्शियम असते, असे मानले जाते.

ओवा

ज्या व्यक्ती दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत, त्यांना कॅल्शिअमची पूर्तता करायची असेल तर ते ओव्याचा आहारात समावेश करू शकतात. अशा व्यक्ती रोज ओव्याचे पाणी पिऊ शकतात. ओव्यामध्ये कॅल्शिअमव्यतिरिक्त पोटॅशिअम, सोडिअम यासारखे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. आयुर्वेदातही ओव्याचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्यास ओवा खाण्यास सांगितले जाते. त्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...