वारंवार तोंड कोरडे पडणे असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण

हवामान उष्ण असताना पुन्हा पुन्हा तहान लागणे साहजिकच आहे, परंतु सामान्य हवेतही घसा कोरडा पडत असेल तर सावध व्हायची गरज आहे. पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच पुन्हा तहान लागणे हे हायपरग्लायसेमियाचेही लक्षण असू शकते.

वारंवार तोंड कोरडे पडणे असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 12:10 PM

नवी दिल्ली – सध्याच्या व्यस्त जीवनात अनेक वेळा आपण शरीरातील लहान-सहान बदलांकडे दुर्लक्ष करतो, मात्र ते पुढे एखाद्या मोठ्या, गंभीर आजारात बदलू शकते. तोंड वारंवार कोरडे पडणे (dry mouth) आणि अचानक तहान (thirst)  वाढणे हीदेखील अशीच लक्षणे आहेत. हवामान उष्ण असताना पुन्हा पुन्हा तहान लागणे साहजिकच आहे, परंतु सामान्य हवेतही घसा कोरडा पडत असेल तर सावध व्हायची गरज आहे. हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे आपण सावध होणे महत्वाचे आहे. रक्तातील साखर वाढण्याला हायपरग्लायसेमियाही (Hyperglycemia)म्हटले जाते.

जर तुम्हाला हाय ब्लड शुगरबद्दल माहिती नसेल तर ते शरीरातील इतर अनेक आजारांचे कारण बनू शकते. हाय ब्लड शुगरकडे दुर्लक्ष करणे ही एक मोठी चूक ठरू शकते. तोंड सतत कोरडे पडणे, तहान वाढणे, तसेच वारंवार लघवी होणे, हे सर्व हायपरग्लायसेमियाचे लक्षण असू शकते. याशिवाय, अशी अनेक लक्षणे आहेत ज्याद्वारे हा आजार ओळखला जाऊ शकतो.

हाय ब्लड शुगर असताना दिसतात ही लक्षणे

हे सुद्धा वाचा

रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे हा मधुमेहावरील उपचाराचा उद्देश असतो. पण कधीकधी मधुमेह असूनही हाय ब्लड शुगरचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, तुम्ही योग्य वेळी हायपरग्लाइसेमिया ओळखून त्यावर उपचार करणे महत्वाचे ठरते. काहीवेळा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे हा फारसा चिंतेचा विषय ठरत नाही, पण ही स्थिती वारंवार उद्भवू लागल्यास आरोग्याबाबत सावध व्हायची गरज आहे. कधीकधी ही स्थिती प्राणघातक देखील ठरू शकते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. अशा स्थितीत अनेक लोकांना जास्त तहान लागते आणि तोंड वारंवार कोरडे पडते, तर काही लोकांना वारंवार लघवी लागते. याशिवाय इतरही अनेक लक्षणे दिसू शकतात:

– थकवा जाणवणे

– अस्पष्ट दिसणे

– कोणत्याही प्रतयत्नांशिवाय अचानक वजन कमी होणे

– स्किन इन्फेक्शन

– ब्लॅडर इन्फेक्शन

या कारणांमुळे वाढू शकते रक्तातील साखर

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. सर्वसाधारणपणे, जीवनशैली आणि अन्न हे त्यात महत्वाचे घटक ठरतात. यासोबतच इतरही अनेक कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

– ताण

– एखाद्या आजारामुळे

– गरजेपेक्षा जास्त खाणे

– व्यायामाचा अभाव

– डिहायड्रेशन

– मधुमेहाशी निगडीत औषधे न घेणे

Non Stop LIVE Update
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा...
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा....