Health : कंबरेवरील वाढत्या चरबीमुळे वाढू शकतो हार्ट ॲटॅकचा धोका, संशोधनातून खुलासा !

ऑक्सफोर्ड युनिव्हिर्सिटीत नुकतीच एका संशोधनातील आश्चर्यकारक माहिती जाहीर झाली असून, ते वाचल्यानंतर अनेक जण आपल्या कंबरेवरील चरबी कमी करण्यास प्राधान्य देतील.

Health : कंबरेवरील वाढत्या चरबीमुळे वाढू शकतो हार्ट ॲटॅकचा धोका, संशोधनातून खुलासा !
हार्ट अटॅकचे कारण Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 9:45 AM

आजकाल हृदयविकाराचा (heart condition) धोका झपाट्याने वाढत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. ऑक्सफोर्ड युनिव्हिर्सिटीत (Oxford University) नुकतीच एका संशोधनातील आश्चर्यकारक माहिती जाहीर झाली आहे. त्या संशोधनानुसार एखाद्या व्यक्तीच्या कंबरेवरील अतिरिक्त इंच अथवा अतिरिक्त चरबीमुळे (extra inch on waistline) हृदयाच्या समस्येचा (heart problem risk) धोका 10 टक्क्यांनी वाढू शकतो. एखाद्या व्यक्तीची कंबर मोठी अथवा जास्त असल्यास हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. या संशोधनातील अभ्यासाचा अर्थ असा होता की, 37 इंच कंबर असलेल्या व्यक्तीपेक्षा ज्या व्यक्तीची कंबर 41 इंच इतकी आहे त्या व्यक्तीला हृदयासंबंधित आजार होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असू शकते. त्याशिवाय, संशोधकांच्या मते जास्त वजन असलेल्या लोकांपेक्षा ज्यांच्या कंबरेचा घेर मोठा आहे, त्या व्यक्तींमध्ये हृदयाशी निगडीत आजार निर्माण होण्याची शक्यता अधिक होती.

काय सांगतात प्रमुख संशोधक ?

या संशोधनाचे प्रमुख संशोधक डॉ. ॲयोडिपुपो ओगुंटाडे ( Dr. Ayodipupo Oguntade) यांच्या सांगण्यानुसार, ‘ ट्रंक फॅट ‘ हे हृदयाची स्थिती विकसित झालेल्या व्यक्तीचे प्रमुख इंडिकेटर होते. त्याशिवाय, शरीरातील स्थूलता आणि कार्डिओव्हॅस्क्युलर धोक्याचा मागोवा घेणाऱ्या स्थूल लोकांचे प्रमाण त्यांच्या कंबरेभोवती फिरत असल्याचे डॉ. ओगुंटाडे यांनी नमूद केले.

याव्यतिरिक्त, हाय बॉडी मास इंडेक्स असणाऱ्या व्यक्तीपेक्षा ज्या व्यक्तीची कंबर मोठी आहे, त्यांना हार्ट फेल्युअरचा त्रास होण्याची शक्यता 3.21 असते, असेही डॉ. ओगुंटाडे यांनी नमूद केले. त्यानंतरच्या श्रेणीतील व्यक्तीमध्ये हार्ट फेल्युअरची जोखीम 2.65 टक्क इतकी होती.

हे सुद्धा वाचा

असे प्रभावित होते हृदयाचे कार्य –

शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार, कंबरेचा मोठा घेर किंवा आकार म्हणजे, त्या व्यक्तीच्या शरीरात अतिरिक्त चरबी असल्याचा संकेत आहे. ही अतिरिक्त चरबी पोटाच्या आजूबाजूला जमा होते आणि रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये रक्ताची गती वाढते. त्याचा परिणाम हृदयाच्या कार्यावर होऊ शकतो.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.