Abortion due to heat: उष्णतेमुळेच संभवतो गर्भपाताचा धोका! मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाचे बाळ आणि मृत बाळाचा जन्म; या समस्यांची कारणे संशोधनात आली समोर
lifestyles lead to miscarriages: आधुनिक जीवनशैलीमुळे मानवी आयुष्य मोठ्या प्रमाणावर प्रभावीत झाले आहे. त्यामुळे गर्भपाताचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (BUSPH) च्या संशोधकांना असे आढळून आले आहे की, उन्हाळ्यात अधिक प्रमाणात गर्भपात होण्याची शक्यता वाढू शकते.
गर्भधारणा राहील्याचे कळताच महिलांनी आपली अधिक काळजी घेणे गरजेचे असते. सद्यस्थितीत बदलत्या जीवनशैलीमुळे गर्भपाताचे प्रमाण (Abortion rate) वाढले असून, सर्वात अधिक गर्भपात उन्हाळ्याच्या दिवसात होत असल्याची माहिती संशोधनाअंती समोर आली आहे. संशोधकांनी ‘एपिडेमियोलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात नमुद केल्या प्रमाणे, 30 टक्क्यांपर्यंत गर्भधारणा शेवटच्या आठवड्यात होते. वीस आठवड्यांपुर्वी गर्भपात होण्याची संख्या कमी असते, त्यातही अर्ध्याहून अधिक गर्भपाताबाबत स्पष्टता नाही. तसेच या गर्भधारणेच्या नुकसानीसाठी ठरावीक जोखीम असणारे घटक (Risk factors) कारणीभुत आहेत, ज्यामध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, नैराश्य आणि चिंता (Depression and anxiety) ही कारणे असू शकतात. संशोधकांनी या अभ्यासात गर्भपाताच्या जोखीम विषयी वेगवेगळ्या काळ व परिस्थीतीत होणारे बदल यांच्यातील फरकांचा शेाध घेतला आहे. यात असे आढळून आले की, गर्भपाताचा सर्वाधिक धोका उष्ण तापमानात अधिक असतो.
काय आढळले संशोधनात
संशोधनाअंती असे आढळून आले की, उत्तर अमेरीकेतील गर्भवतींना लवकर गर्भपाताचा धोका 44 टक्क्याहून अधीक होता. विशेषतः ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात (गर्भधारणेच्या आठ आठवड्यांच्या आत) हे प्रमाण अधिक होते. गरोदरपणाच्या कोणत्याही आठवड्यात गर्भपात होण्याचा धोका फेब्रुवारीच्या तुलनेत ऑगस्टच्या शेवटी 31 टक्क्यांनी जास्त होता. भौगोलिकदृष्ट्या, परिणामांवरून असे दिसून आले आहे की, दक्षिण आणि मध्यपश्चिमी उष्ण प्रदेशात जिथे उन्हाळा सर्वाधिक उष्ण असतो, अशा गरोदर महिलांना अनुक्रमे ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीस गर्भाचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. हे परिणाम सूचित करतात की, अनपेक्षित गर्भपात हे अति उष्णतेची संभाव्य धोक्यामुळे आणि पर्यावरण किंवा चुकीच्या जीवनशैली मुळे होत असून याच्यावर अतिरिक्त संशोधन होणे अत्यावश्यक असल्याचे मत संशोधकांनी नोंदवले आहे.
तज्ज्ञ काय सांगतात
अभ्यासाच्या प्रमुख संशोधक लेखिका डॉ.अमेलिया वेसेलिंक ज्या BUSPH येथील एपिडर्मीयोलॉजी विभाग प्रमुख आणि सहायक प्राध्यापकही आहेत. त्यांनी सांगीतले की, आम्हाला असे आढळून आले की गर्भपाताचा धोका, विशेषत: गर्भधारणेच्या आठ आठवड्यांपूर्वी ‘लवकर’ गर्भपात होण्याची शक्यता उन्हाळ्यात सर्वाधिक असते. आता उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कारणे अधिक प्रचलित आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याबद्दल अधिक जाणून घेणे आवश्यक आहे. कोणत्या इतर गटात मोडणा-या कारणांमुळे गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.”
6104 महिलांवर केले संशोधन
अभ्यासासाठी, वेसेलिंक आणि सहकाऱ्यांनी BUSPH-आधारित प्रेग्नन्सी स्टडी ऑनलाइन (PRESTO) मध्ये गर्भधारणा नियोजकांमधील गर्भपात(miscarriage) सर्वेक्षण डेटाचे विश्लेषण केले, जो 2013 पासून सुरू असलेला NIH-निधीचा अभ्यासाचा भाग आहे. ज्यामध्ये गर्भधारणेसाठी इच्छूक महिलांची नोंदणी केली जाते आणि त्यांना सहा महिन्यांपर्यंत पूर्व गर्भधारणेपासून निरीक्षण केले गेले. या महिलांच्या डिलिव्हरी नंतर सर्व PRESTO सहभागी सामाजिक जनसांख्यिकी, जिवनशैली आणि वैद्यकीय इतिहासावर आधारभूत माहितीचे संकलन करुन ती सादर केली. या अभ्यासासाठी, संशोधकांनी 6,104 मंहिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. नंतर ज्यांची नोंदणी केल्यानंतर 12 महिन्यांच्या त्यांना आत गर्भधारणा झाली. त्यांनी गर्भधारणेच्या कोणत्याही प्रकारची हानी, तोटा झाल्याची तारीख आणि गर्भधारणेचे आठवडे यांविषयी अचूक माहिती संशोधकांना दिली.
संशोधनाचे निष्कर्ष
संशोधकांत नमुद हंगामी गर्भपाताच्या प्रकरणात संशोधकांनी संकलीत नमुन्यांवरील माहितीमधील तफावत स्पष्ट केली. निष्कर्षात वेसेलिंक यांनी सांगितले की, “उष्णतेमुळेच गर्भपाताचा अधिक धोका संभवतो. जसे की मुदतपूर्व प्रसूती, कमी वजन आणि मृत बाळाचा जन्म, विशेषतः “वैद्यकीय मार्गदर्शन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत उष्मा कृती योजना आणि हवामान अनुकूलन धोरणांसह गर्भवती आणि बाळांच्या आरोग्यावर उष्णतेचे संभाव्य धोके गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. उष्णतेचा गर्भवतीवर होणारा परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे.