Fact Check | लिंबू आणि बेकिंग सोडा मिश्रित गरम पाण्याने खरंच कोरोना विषाणू मरतो? जाणून या मागचं सत्य!
कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याच्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर होता कामा नये. औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. तथापि, या संदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेजही व्हायरल होत आहेत.
मुंबई : देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेत संक्रमणाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. 24 तासांत सुमारे 3 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही आकडेवारी खरोखर भयानक आहे. तथापि, कोरोनाची भीती बाळगण्याऐवजी त्याच्याशी लढा देण्याची वेळ आल्याचे आरोग्य मंत्रालय आणि सरकारकडून म्हटले जात आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी फेस मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग प्रभावी संरक्षण असल्याचे म्हटले जाते. देशाच्या सर्व भागात, कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यासाठी निर्बंध घालण्याचे आवाहन देखील केले जात आहे (Fact Check drinking hot water with lemon and soda can cure corona virus).
तथापि, कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याच्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर होता कामा नये. औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. तथापि, या संदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेजही व्हायरल होत आहेत. असे केल्याने कोरोनाव्हायरस मरणार, तसे केल्याने कोरोना त्वरीत बरा होईल…. हे केले तर कोरोना संसर्ग होणार नाही…. आणि असेच इतर अनेक उपाय सांगितले जात आहेत. मात्र, अशा खोट्या आणि चुकीच्या मेसेजेसवर विश्वास ठेवल्यास तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
लिंबू आणि बेकिंग सोडा मिसळून गरम पाणी प्यायल्याने कोरोना मरतो?
असाच एक संदेश आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात असे म्हटले आहे की, लिंबाचे तुकडे आणि बेकिंग सोडा मिसळून कोमट पाणी प्यायल्याने कोरोना व्हायरस त्वरित मरून जातो. असे केल्याने संपूर्ण शरीरातून विषाणूचा नाहीसा होतो. एका इस्त्रायली तज्ज्ञाच्या नावे हा मेसेज व्हायरल होत आहे. असे म्हटले जाते की, गरम पाण्यात लिंबू आणि बेकिंग सोडा मिसळून दुपारच्या वेळी चहाप्रमाणे लोकांनी त्याचे सेवन करावे. हा कोरोनाचा एक अगदी सोपा उपचार आहे. तथापि, सरकारने याबाबत सावधगिरी बाळगली आहे (Fact Check drinking hot water with lemon and soda can cure corona virus).
काय आहे ‘या’ व्हायरल मेसेजचे सत्य?
सरकारी माहिती एजन्सी पीआयबी अर्थात प्रेस इन्फर्मेशन ब्युरोची एक तथ्य तपासणी (Fact Check) टीम असून, ती अशा अफवांचा खंडन करते. पीआयबी फॅक्टचेकनेही या संदेशात दिलेली माहिती ट्विट करून ती खोटी असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरस नाहीसा करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्यासह गरम पाण्याचे सेवन करण्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पूर्णपणे खोटा आहे. कोरोना व्हायरसपासून लिंबू आणि बेकिंग सोडा संरक्षण प्रदान करू शकेल, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
पाहा PIBचे ट्विट
A message claiming that drinking hot water with lemon slices & baking soda “immediately kills #COVID19 & completely eliminates it from body” is in circulation #PIBFactCheck: This claim is #Fake
There is no scientific evidence that #COVID19 can be cured by lemon & baking soda pic.twitter.com/UAxqdbE0wL
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 22, 2021
(Fact Check drinking hot water with lemon and soda can cure corona virus)
हेही वाचा :
Fact Check | मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?
Fact Check | दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य…