कोरोनाच्या भीतीने मानसिक आरोग्य होऊ शकते खराब, तज्ज्ञांकडून जाणून घ्या बचावाचे उपाय
गेल्या वेळी कोरोनाची लाट आली होती तेव्हा लोकांच्या मानसिक आरोग्यावर बराच परिणाम झाला होता. डिप्रेशन, एंक्झायटी आणि पॅनिक ॲटॅकच्या केसेस खूप वाढल्या होत्या.
नवी दिल्ली – चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या केसेस (corona in china) पुन्हा वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही सतर्क झाले असून मास्क लावणे (use mask) , हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर पाळणे याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वेळी कोरोनाची लाट आली होती तेव्हा लोकांच्या मानसिक आरोग्यावर (mental health) बराच परिणाम झाला होता. डिप्रेशन, एंक्झायटी आणि पॅनिक ॲटॅकच्या केसेस खूप वाढल्या होत्या. यावेळी कोरोनाचा वाढता धोका पाहता मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवणे फार गरजेचे आहे. विशेषत: ज्या लोकांना आधीपासूनच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी पुरेशी काळजी घेणे महत्वाचे ठरते.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार यावेळेस चिंता आणि भीतीमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. जर एखाद्या व्यक्तीला एंक्झायटी डिसऑर्डर असेल तर त्या व्यक्तीने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार झाल्यास हा आजार गंभीर होण्यापासून रोखता येऊ शकते. कारण वेळेवर उपचार न झाल्यास एंक्झायटीमुळे लोकं डिप्रेशनचे बळीही होऊ शकतात. पहिल्या टप्प्यात डिप्रेशनवर उपचार न झाल्यास रुग्णाची प्रकृती बिघडू शकते आणि काही प्रसंगांमध्ये आत्महत्याही करू शकतात.
तज्ज्ञ काय सांगतात ?
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कोरोनाची (अती) काळजी करू नये. मानसिक आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास आरोग्य हेल्पलाइन नंबरवर कॉल करावा. योगासने आणि मेडिटेशन यांचा नियमितपणे सराव करावा. तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी गप्पा मारत राहा. त्याशिवाय काही पद्धतींचाही अवलंब करता येऊ शकतो.
दररोज 15 मिनिटं निसर्गाच्या सान्निध्यात घालवा
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने दररोज निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवला पाहिजे. तुम्ही उन्हात बसू शकता. सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी मिळते ज्याचा तुमच्या आरोग्याला खूप फायदा मिळेल. तसेच रात्री चांगली झोपही लागण्यास मदत होईल.
व्यायाम करावा
नवीन वर्षात अधिक व्यायाम करण्याचा संकल्प करणे ही एक चांगली कल्पना ठरू शकते. तुम्हाला आवडेल असा व्यायाम निवडा. ज्यामुळे तुम्ही तो सातत्याने व नियमितपणे कराल. धावणे, सायकलिंग आणि कोणत्याही खेळाची निवड तुम्ही करू शकता.
स्वत:ची काळजी घ्या
तुम्ही तुमच्या आयुष्यातील इतर व्यक्तींची काळजी घेण्यापूर्वी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नवीन वर्षात, आराम करण्यासाठी स्वत: ला थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करा. यामुळे तुम्ही वर्षभर आनंदी राहू शकता.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)