COVID-19 : कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतरही अशक्तपणा जाणवतोय? जाणून घ्या काय करावे
कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णांना कमजोरी जाणवते. यासाठी व्यायामासोबतच योग्य आणि सकस आहार घेणेही फार महत्वाचे आहे. (Feeling weak after corona infection is cured, know what to do)
नवी दिल्ली : भारतात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णालयात बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजन, औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे. तथापि, अनेक रुग्ण धैर्याने या धोकादायक व्हायरसमधून मुक्त होत आहेत. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण अतिशय काळजी घेत आहे. तज्ज्ञांचा सल्लाही घेत आहे. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णांना कमजोरी जाणवते. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बरे होण्यास दोन आठवडे लागतात, तर गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बरे होण्यास तार आठवडे लागतात. यासाठी व्यायामासोबतच योग्य आणि सकस आहार घेणेही फार महत्वाचे आहे. (Feeling weak after corona infection is cured, know what to do)
भाज्या खा
भाज्यांमध्ये विटामीन आणि खनिजांचे भरपूर प्रमाण असते, जे आपल्या शरीरात उर्जा निर्माण करते. यासाठी हंगामी भाज्यांचे भरपूर सेवन करा. यामुळे आपल्या शरीरातील विटामीनचे प्रमाण संतुलित राहते.
फळे खा
आपल्या नाश्त्यामध्ये डाळींब, सफरचंद, पपई यासारख्या विविध प्रकारच्या फळांचा समावेश करा. फळांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते.
पाणी प्या
पाणी हे शरीरासाठी वरदान आहे. जेव्हा तुम्ही रिकव्हर होत असता तेव्हा आपले डिहायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. आपण नारळ पाणी, सरबत ही पिऊ शकता.
गरम दूध प्या
दूध शरीरासाठी लाभदायी मानले जाते. दुधामुळे शरीराला अनेक फायदे होतात. रोज रात्री झोण्यापूर्वी दूधामध्ये चिमूटभर हळद टाकून प्या. यामुळे आपली हाडे मजबूत होतील.
एँटीऑक्सिडेंट आणि प्रोटीनयुक्त भोजन खा
अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, जामुन असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने आजारातून लवकर रिकव्हर होण्यास मदत होईल. तसेच, व्हिटॅमिन सी, मल्टीविटामिन आणि झिंकच्या गोळ्या घेत रहा कारण यामुळे आपल्या शरीरातून विष बाहेर पडण्यास मदत होईल.
व्यायाम करा
सकस आहारासोबतच शरीरासाठी व्यायमही तितकाच गरजेचा आहे. श्वासोच्छवास चांगले ठेवण्यासाठी श्वसनाशी संबंधित व्यायाम करा. (Feeling weak after corona infection is cured, know what to do)
Special Report | राज्यात ठिकठिकाणी लसीचा तुटवडा, लसीकरणाचं काय होणार ?https://t.co/qYnDwpAFj2#corona | #VaccinationCovid |
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2021
इतर बातम्या
IPL 2021, Prithvi Shaw | पृथ्वी शॉचा धमाका, पहिल्याच ओव्हरच्या 6 चेंडूत फटकावले 6 चौकार