वजन कमी करण्यासाठी तुम्हीही केलयं का रात्रीचे जेवन बंद? असे केल्याने होते आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या, रात्री जेवन न करण्याचे तोटे!
रात्रीचे जेवण न केल्याने वजन कमी होईल, असा विचार करून बहुतेक लोक रात्रीचे जेवण करत नाहीत. पण ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. यासाठी, अशा अनेक पद्धती अवलंबल्या जात आहेत, ज्या प्रभावी ठरू शकतात. परंतु त्यांचे अनेक तोटे देखील आहेत.
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रात्रीचे जेवण करणे टाळतात. परंतु, त्यांची ही चुकीची गोष्ट (Wrong thing) त्याच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. रात्री जेवण न घेणे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे आणि लोक ही पद्धत खूप फॉलो करत आहेत. लोकांना असे वाटते की जर त्यांनी रात्री जेवण केले नाही तर त्यांचे वजन कमी होईल. तसे, जर दिवसभर अन्न खाल्ले नाही तर त्याचा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, परंतु जर ते सतत केले तर शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रात्रीचे जेवण न केल्याने (Not having dinner) शरीरात पोषक तत्वांची कमतरता (Nutrient deficiencies) होत असते आणि अनेक गोष्टी करण्याची ताकद शरीरात राहत नाही. जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवनाला नाकारात असाल तर तुमच्यासाठी एकदा शरीराला होणारे नुकसान जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
शरीरात पौष्टिकतेची कमतरता
अनेकदा लोक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रात्रीचे जेवण टाळतात. त्यांना असे वाटते की असे केल्याने ते त्यांचे वजन जलद गतीने कमी करू शकतात, परंतु जे लोक रात्रीचे जेवण करत नाहीत त्यांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते. त्याच वेळी, शरीर कुपोषित होऊ लागते, ज्यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येण्यासोबत रक्त कमी होऊ शकते.
एनर्जी लेव्हलचा अभाव
अनेकदा लोकांना असे वाटते की झोपताना ऊर्जा खर्च होत नाही, त्यामुळे तुम्ही रात्री जेवण केले नाही तरी तुमच्या शरीरात पोषण टिकून राहते. पण असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. याचे कारण असे की तुम्ही झोपत असतानाही तुमचे शरीर आणि तुमचे मन हालचाल करत असते. त्यामुळे झोपेत असतानाही तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता भासू शकते. अशा स्थितीत शरीरातील ऊर्जा पातळी दुसऱ्या दिवशीही कमी होऊ शकते.
झोप न येण्याची समस्या
रात्रीचे जेवण न केल्याने तुम्हाला भूक लागत राहते, ज्यामुळे तुम्हाला नीट झोप येत नाही. ज्या लोकांना रात्री जेवण न करण्याची सवय असते, त्यांना अनेकदा झोप न येण्याची समस्या सतावते. भूक लागल्याने झोपेचा त्रास होतो असे म्हणतात. इतकेच नाही तर कधी-कधी रिकाम्या पोटी गॅस बनू लागतो आणि त्यामुळे रात्री नीट झोपही येत नाही. तज्ञांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही रात्री हलका आहार घेऊ शकता.