Corona vaccination: स्पुटनिक व्हीच्या पहिल्या डोसचा वापर बुस्टर डोस म्हणून करा ; ‘एनटीएजीआय’ची शिफारस

स्पुटनिक व्ही या रशियन लसीबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या नागरिकांनी स्पुटनिक व्ही या लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना आता बुस्टर डोस म्हणून याच लसीचा पहिला डोस देण्यात यावा अशी शिफारस 'एनटीएजीआय'कडून करण्यात आली आहे.

Corona vaccination: स्पुटनिक व्हीच्या पहिल्या डोसचा वापर बुस्टर डोस म्हणून करा ; 'एनटीएजीआय'ची शिफारस
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 8:37 AM

देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोना रुग्ण वाढीमध्ये दिल्ली आघाडीवर असून, गेल्या आठ दिवसांमध्ये राजधानी दिल्लीमध्ये दररोज सरासरी एक हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेला जर थोपवायचे असेल तर लसीकरण (vaccination) हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून बुस्टर डोसवर भर देण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्पुटनिक व्ही या रशियन लसीबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या नागरिकांनी स्पुटनिक व्ही या लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्या नागरिकांना आता बुस्टर डोस म्हणून स्पुटनिक व्ही या लसीचा पहिला डोस देण्यात यावा अशी शिफारस राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या समितीने (NTAGI) केली आहे. याबाबत सुत्रांकडून माहिती प्राप्त होत आहे. स्पुटनिक व्ही या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये भिन्न संरचना आहे. त्यामुळे ज्यांनी या लसीचे दोन डोस घेतले त्यांना बुस्टर डोस मिळू शकला नव्हता. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत ज्या नागरिकांनी स्पुटनिक व्हीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना स्पुटनिक व्हीचा पहिला डोस बुस्टर डोस म्हणून देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

सहा लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात आतापर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांनी स्पुटनिक व्ही लसीचे दोनही डोस घेतले आहेत. मात्र या लसीचं वैशिष्ट म्हणजे या लसीच्या दोन डोसमध्ये भिन्नता आहे. त्यामुळे ज्या लोकांनी स्फुटनिक व्ही लस घेतली होती, त्यांच्या बुस्टर डोसचा प्रश्न निर्माण झाला होता. या नागरिकांना बुस्टर डोस म्हणून स्फुटनिक व्हीचा पहिला डोस द्यावा की दुसरा याबाबत चर्चा सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत ज्या नागरिकांनी स्पुटनिक व्हीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना स्पुटनिक व्हीचा पहिला डोस बुस्टर डोस म्हणून देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

स्पुटनिक व्हीचा पहिला डोस बुस्टर डोस

सरकारी उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मिळत असलेल्या माहितीनुसार शुक्रवारी NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत ज्या नागरिकांनी स्पुटनिक व्हीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना स्पुटनिक व्हीचा पहिला डोस बुस्टर डोस म्हणून देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे. म्हणजेच आता ज्या नागरिकांनी स्पुटनिक व्ही या लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना बुस्टर डोस म्हणून स्पुटनिक व्हीचा पहिला डोस बुस्टर डोस म्हणून दिला जाण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.