Fitness | जिममध्ये घाम गाळूनही ‘बॉडी’ बनत नाहीय? मग ‘या’ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!

धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहण्याची इच्छा असते. चांगल्या जीवनशैलीसाठी देखील ते आवश्यक आहे.

Fitness | जिममध्ये घाम गाळूनही ‘बॉडी’ बनत नाहीय? मग ‘या’ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 5:04 PM

मुंबई : धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहण्याची इच्छा असते. चांगल्या जीवनशैलीसाठी देखील ते आवश्यक आहे. पण, आजकाल तरूणांना निरोगी दिसण्यापेक्षा आकर्षक दिसण्याची जास्त इच्छा आहे. ज्यासाठी ते तासान तास जिममध्ये घाम गाळत असतात. परंतु, असे बरेच लोक आहेत जे व्यायाम करून, जिममध्ये घाम गाळून, चांगला आहार घेत असूनही हवे तसे स्नायू तयार करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत काही लोक औषधांचा अवलंब करतात, परंतु त्यांचे दुष्परिणाम पाहता हा निर्णय घेणे योग्य नाही. चला तर, जाणून घेऊया कोणतीही पावडर किंवा औषधे न घेता आपण उत्कृष्ट शरीर कसे तयार करू शकता…(Fitness tips for building muscles)

कमी वजनाने सुरुवात करा.

व्यायामाच्या सुरूवातीस, आपण कमी वजन घेऊन व्यायाम सुरू केला पाहिजे आणि हळूहळू वेळेसह वजन वाढवावे. यामुळे स्नायू अधिक चांगले होतील. कारण, जास्त वजनाने तुम्ही कमी रॅप्स कराल आणि कमी वजनाने जास्त. तसेच व्यायामामध्ये जास्त वजनही वापरु नये.

आहारात केवळ प्रथिने घेऊ नका.

अनेक लोक मसल्स बनवण्यासाठी जास्त प्रथिने घेण्यास सुरुवात करतात, परंतु स्नायू बनवण्यासाठी आणि चांगले शरीर मिळविण्यासाठी केवळ प्रथिने पुरेशी नसतात. यासह आपण चरबी आणि कार्बोहायड्रेट देखील पर्याप्त प्रमाणात घ्यावे. आपल्याला कर्बोदकांमधून ऊर्जा मिळते आणि चरबीयुक्त घटक शरीरातील वाढ संप्रेरकासाठी आवश्यक आहेत. म्हणून आपला आहार संतुलित ठेवा, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन तसेच कार्बोहायड्रेट्स आणि चरबी असेल.

दिवसानुसार व्यायाम करा.

सुरुवातीला लोक एका दिवसात संपूर्ण शरीर व्यायाम करतात. परंतु, जर आपल्याला लवकर आणि चांगले शरीर तयार करायचे असेल, तर आपण दिवसाप्रमाणे व्यायाम केला पाहिजे. म्हणजे, एक दिवस केवळ बाहूंचा व्यायाम आणि दुसर्‍या दिवशी पाय किंवा खांदे. यामुळे लवकरच आपल्या शरीरावर व्यायामाचा परिणाम दिसून येईल (Fitness tips for building muscles).

सेटमध्ये फार वेळाचा फरक नसावा.

लोक व्यायाम करताना सेट्समध्ये बराच गॅप ठेवतात आणि विश्रांती घेण्यास सुरुवात करतात. यामुळे, आपल्या स्नायूंवर जास्त दबाव नसतो आणि व्यायामाचा परिणाम दिसण्यासाठी दीर्घकाळ वाट पहावी लागू शकते. म्हणून, दोन सेटमध्ये एका मिनिटापेक्षा जास्त फरक असू नये.

भरपूर पाणी प्या.

आपल्या शरीराच्या निम्म्या भागापेक्षा जास्त पाणी आहे. पाणी स्नायू बनवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. तसेच, व्यायामादरम्यान, घामांच्या स्वरूपात आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर टाकले जाते. म्हणून, शरीरात स्नायू आणि पाण्याचा संतुलन राखण्यासाठी भरपूर पाणी प्या.

झोपेचा अभाव

व्यायामानंतर आरोग्यासाठी निरोगी अन्न आवश्यक आहे, परंतु काही लोकांना हे ठाऊक नाही की, चांगले खाण्याबरोबरच चांगले शरीर मिळण्यासाठी चांगली झोप देखील आवश्यक असते. जर आपण 7-8 तास झोपत नसाल, तर हे आपल्या शरीरातील तणाव संप्रेरक वाढवू शकते, ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.

व्यायाम सुरू करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करा.

यामुळे आपले स्नायू लवचिक होतील आणि व्यायामचा वेळ वाढण्याची शक्यता देखील वाढेल. स्ट्रेचिंग न केल्यामुळे दुखापत होण्याचा धोका देखील वाढतो.

दिवसातून 6 वेळा अन्न खा.

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, चांगल्या शरीरासाठी, दिवसातून किमान 6 वेळा अन्न खा. यापैकी तीन मील जड आणि तीन मील हलके असावेत. न्याहारी हा आपल्या अन्नामधील सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणून कधीही न्याहारी टाळू नका.

(टीप : कोणत्याही बदलांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Fitness tips for building muscles)

हेही वाचा :

Pain Killer Side Effects | हलक्याशा वेदनांसाठीही ‘पेन किलर’ घेताय? किडनी होऊ शकते निकामी!

Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.