लघवी करताना फेस येतोय तर हा आजार झाल्याची शक्यता, वेळीच या चाचण्या करुन घ्या
तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल किंवा लघवीतून सारखा फेस येत असेल लघवीचा रंग बदलला असेल तर ही गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही या चाचण्या वेळेत करून घ्या...
लघवीत फेस येणे अनेकदा सर्वसामान्य गोष्ट असू शकते. परंतू असे वारंवार होत असेल तर गंभीर आरोग्य समस्येचे संकेत असू शकतात. लघवीच्या रंगात बदल होणे. लघवी करताना जळजळ होणे हे अनेक आजाराचे संकेत असू शकतात आणि त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये तातडीने डॉक्टराचा सल्ला घ्यावा आणि चाचण्या कराव्यात असे तज्ज्ञांचे मत आहे.
तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला जर अशा प्रकारे लघवी करताना फेस येण्याची लक्षणे वारंवार दिसत असतील, तर त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला द्यावा. ही शरीरातील काही आरोग्याच्या समस्येची लक्षणे असू शकतात. लघवीत जर वारंवार फेस येत असेल तर तुम्हाला काही टेस्ट करणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्या टेस्ट करु शकता..
लघवीतून फेस येणे गंभीर समस्या असू शकते
शरीरात प्रोटीनची पातळी वाढणे : किडनीच्या समस्येमुळे लघवीत प्रोटीन येऊ शकतात. त्यामुळे देखील लघवी फेसाळ बनलेली दिसते.
किडनीची समस्या : जर तुमची किडनी योग्य प्रकारे काम करीत नसेल तरी देखील लघवीत फेस येऊ शकतो.वास्तविक किडनीशी संबंधित समस्यांमध्ये देखील लघवीत फेस येण्याचे मोठे कारण असू शकते.
डायबिटीज: डायबिटीज म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांना लघवीत अधिक फेस साखरेमुळे येतो. जेव्हा शरीरात साखरेची पातळी वाढते तेव्हा देखील लघवीत फेस तयार होऊ शकतो.
मूत्रमार्गातील संसर्गामुळे ( युटीआय ) किंवा प्रोस्टेट ग्रंथीच्या समस्येमुळे देखील फेसयुक्त लघवी येऊ शकते.
लघवीत फेस आल्यानंतर कोणत्या टेस्ट कराव्यात ?
युरिन रुटीन टेस्ट : लघवीत प्रोटीन, ग्लुकोज आणि तत्वांची तपासणीसाठी ही चाचणी गरजेची आहे.
ब्लड टेस्ट (किडनी फंक्शन टेस्ट): किडनीच्या कार्यप्रणालीची तपासणी करण्यासाठी ही टेस्ट करावी.
मायक्रोएल्ब्यूमिन टेस्ट: लघवीतील प्रोटीनची तपासणी करण्यासाठी ही तपासणी करावी लागते.
अल्ट्रासाऊंड ( किडनी आणि प्रोस्टेट टेस्ट ): किडनी आणि मूत्र मार्गाची स्थिती जाणण्यासाठी तपासणी
डॉक्टरांशी केव्हा संपर्क करावा ?
जर वारंवार लघवीला येत असेल तर चाचणी करावी. लघवीचा रंग गडद पिवळा किंवा असामान्य लाल असेल. किंवा लघवी करताना जळजळ आणि दुखद असेल किंवा त्रास होत असेल आणि शरीरात सूज आली असेल तर डॉक्टरांशी संपर्क करावा.