पावसाळ्यात रहायचे असेल फिट तर या गोष्टीं घ्या खास काळजी
पावसाळ्याचे दिवस जेवढे छान, उत्साहवर्धक वाटतात, तेवढेच त्या काळात रोगराई पसरण्याचीही भीती जास्त असते. अशा ऋतूमध्ये खाण्या-पिण्याबद्दल जराही निष्काळजीपणा करणे घातक ठरू शकते.
नवी दिल्ली : दिल्ली, मुंबई सह अनेक भागांत मान्सूनने दस्तक दिली आहे. मान्सूनमुळे गरमीपासून तर सुटका मिळतेच पण त्यासोबतच डेंग्यू, मलेरिया असे अनेक आजारही येतात. अशावेळी आरोग्याबद्दल विशेष काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. आरोग्याकडे जराही दुर्लक्ष केले तर ते जीवघेणे ठरू शकते.
पावसाळ्यात सर्वात जास्त संक्रमण हे बाहेरच्या खाण्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे या ऋतूत तब्येत चांगली राखायची असेल आणि मुख्य म्हणजे आजारी पडायचे नसेल तर या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. फिट अँड फाईन रहायचे असेल तर त्यासाठी काही टिप्स फॉलो करणे महत्वाचे ठरते.
पाणी उकळून प्यावे
पावसाळ्याच्या दिवसात पाणी नेहमी उकळूनच प्यावे, असे केल्याने पाण्यातील जीवाणू , कीटाणू नष्ट होतात. त्याशिवाय रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायल्याने शरीरातील हानिकारक किटाणू, जंत बाहेर पडतात.
मीठ कमी खावे
मान्सूनमध्ये जेवणात मीठ थोडे कमीच खावे. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडिअमचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास वाढू शकतो. जे भविष्यात आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते.
फळांचे सेवन वाढवावे
या मोसमात फक्त ऋतूमानानुसार मिळणाऱ्या फळांचेच सेवन करावे. त्यामुळे रोगप्रतिकारकल शक्ती वाढत. तसेच त्याती पोषक तत्वामुळे शरीराचे पोषणही चांगले होते.
भरपूर झोप घ्यावी
या ऋतूमध्ये इम्युनिटी वाढवणारे पदार्थ खावेत. भोपळा, ड्रायफ्रुट्स, व्हेजिटेबल सूप,बीट असे पदार्थ खावेत. तसेच दररोज कमीत कमी ७-८ तास झोप घ्यावी.
बाहेरचे खाणे टाळावे
पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. चांगले आरोग्य हवे असेल तर बाहेरचे किंवा उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. ते पदार्थ कसे, कधी बनवले, स्वच्छतेची काळजी घेतली आहे की नाही, याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.
कच्चे पदार्थ खाणे टाळावे
मान्सूनमध्ये कोणतेही कच्चे पदार्थ खाणे टाळावे. या ऋतूमध्ये मेटाबॉलिज्म अतिशय संथ असते. त्यामुळे अन्न उशीरा पचते. पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ, ज्यूस तसेच कच्चे पदार्थ खाऊ नयेत.