‘हा’ उपाय करताच काही क्षणात हिरड्यातून रक्त येणं थांबलं, तुम्हीही याच समस्येने ग्रासलात? ; मग बातमी तुमच्यासाठी

Gum Care Tips - दात कमकुवत झाल्यास हिरड्यांना सूज येणे किंवा त्यामधून रक्त येणे असा त्रास होऊ शकतो. हे कॉमन आहे. पण कधी कधी हा त्रास इतका वाढतो, की काही खाणे-पिणे देखील त्रासदायक होते. दात व हिरड्या हेल्दी ठेवण्यासाठी टिप्स जाणून घ्या.

'हा' उपाय करताच काही क्षणात हिरड्यातून रक्त येणं थांबलं, तुम्हीही याच समस्येने ग्रासलात? ; मग बातमी तुमच्यासाठी
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 4:48 PM

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : आपण आपल्या दातांसोबतच (teeth care) हिरड्यांची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे रोज दात घासतानाच हिरड्या स्वच्छ करणेही गरजेचे ठरते. हिरड्या निरोगी (gum care tips) असतील तर दातही मजबूत असतात. पण जर हिरड्या कमकुवत झाल्या तर काही काळाने दात हलू लागतात आणि ते पडू शकतात. हिरड्या निरोगी नसतील तर त्यांना सूज येणे, रक्तस्त्राव होणे अशा समस्या उद्भवतात.

काही वेळा दातांमधील कॅव्हिटी, प्लाक जमा होणे हेही यासाठी कारणीभूत ठरू शकते. बऱ्याचदा अनेक लोकांच्या हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो, पण लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र त्यामुळे दात आणि हिरड्या दोन्ही खराब होतात. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी रहायला हवे असतील तर काही महत्वपूर्ण आणि प्रभावी टिप्स फॉलो करू शकता.

दोन वेळा करा ब्रश

दिवसातून दोनदा तरी ब्रश करावे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासणे महत्वाचे असते. असे केले नाही तर हिरड्यांमधून रक्त येणे, दातदुखी, प्लेक तयार होणे, पोकळी निर्माण होणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

योग्य टूथपेस्ट निवडा

आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या टूथपेस्ट उपलब्ध आहेत. दात चमकावण्यापासून ते दातांच्या प्रत्येक समस्येसाठी वेगवेगळ्या टूथपेस्ट बाजारात उपलब्ध आहेत. पण टूथपेस्ट निवडताना, हे लक्षात ठेवावे की आपल्या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असणे आवश्यक आहे. फ्लोराईड टूथपेस्टच्या वापराने दातांमध्ये प्लेकची समस्या, हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर होऊ शकतात.

डेंटल फ्लॉस वापरा

फक्त ब्रश करूनच दात स्वच्छ होतील असे नाही. कधीकधी दातांच्या फटीत पदार्थांचे छोटे कण अडकतात, ज्यामुळे तोंडातून दुर्गंध येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिवसभरात एकदा तरी डेंटल फ्लॉसचा वापर करावाच.

माउथवॉशही वापरा

हिरड्या निरोगी व नजबूत ठेवण्यासाठी माउथवॉशचाही वापर केला जाऊ शकतो. दररोज माउथवॉश केल्याने दातांवर प्लाक तयार होत नाही आणि ओरल कॅव्हिटीलाही प्रतिबंध होतो.

हेल्दी आहार घ्या

निरोगी हिरड्यांसाठी हेल्दी डाएट घेणेही महत्वाचे आहे. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन -C युक्त फळं, हिरव्या पालेभाज्या , सी-फूड आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.