Mood Boosters : सतत असतो तुमचा मूड खराब ? ‘या’ टिप्स वापरून पहा
धावपळीच्या जीवनात आजकाल लोक खूप तणावात राहतात. हा ताण टाळण्यासाठी आणि तुमचा मूड सुधारण्यासाठी तुम्ही काही टिप्स देखील फॉलो करू शकता.
नवी दिल्ली – मूड खराब होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये खराब जीवनशैली, ऑफिसचे टेन्शन, खराब आर्थिक परिस्थिती, घरचे टेन्शन (tension) अशा अनेक समस्यांचा समावेश होतो. या अनेक समस्यांमुळे लोक खूप तणावाखाली (stress) राहतात. त्यामुळे, त्यांचा मूडही नेहमी खराब असतो. अशा परिस्थितीत व्यक्तीला प्रत्येक छोट्या गोष्टीचा राग येऊ लागतो तसेच चिडचिडही होऊ लागते. याचा मानसिक आरोग्यावर (mental health) खूप वाईट परिणाम होतो. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही बिघडलेला मूड सुधारण्यासाठी (how to improve mood) काही टिप्स फॉलो करू शकता.
सकाळी लवकर उठावे
सकाळी उठण्याच्या रोजच्या वेळेपेक्षा 15 मिनिटे आधीचा गजर लावा. 15 मिनिटे लवकर उठून तुम्ही संपूर्ण दिवसाचे नियोजन करू शकाल. यामुळे दिवसभरातील सर्व कामे वेळेवर करण्यास मदत होते. व त्यामुळेही चिडचिड टळते. तुम्हाला काय काम करायचे हे तुमच्या मनात स्पष्ट होईल.
थोडं हसा तरी….
सकाळी उठल्यावर सर्वप्रथम थोडं हसा. तणावग्रस्त आणि अस्वस्थ मनाने जागे होऊ नका. चेहऱ्यावर हलके हसू ठेवा. ही युक्ती तुमचा मूड सुधारवण्यास मोठ्या प्रमाणात मदत करेल.
कृतज्ञता
कृतज्ञतेची भावना ठेवा. जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
सकारात्मकता
नकारात्मक स्व-संवादामुळे तुमचा नाश होऊ शकतो. या जगात कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही. त्यामुळे दृष्टिकोन बदला. स्वतःबद्दल चांगला विचार करा. ही गोष्ट तुम्हाला सकारात्मक राहण्यास मदत करेल.
चालायला जा
जर तुम्हाला ताण-तणाव वाटत असेल तर थोडा वेळ बाहेर फिरायला जा. यामुळे तुम्हाला आराम वाटेल. तसेच तुमचा ताण कमी होण्यासही मदत होईल. आणि तुमची चिंता दूर होईल.
संगीत ऐका
तुमचा मूड वाढवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी तुम्ही संगीत ऐकू शकता. यामुळे तुम्हाला खूप हलकं वाटेल. तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐकू शकता आणि गुणगुणूही शकता.
मन स्वच्छ ठेवा
दररोज 5 मिनिटे स्वत:ला द्या. स्वत:शी संवाद साधून मन स्वच्छ करा. नकारात्मक विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करा.
चांगली झोप घ्या
चांगलं आरोग्य हवं असेल तर चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान 8 तासांची झोप घेतली पाहिजे. यामुळे तुमचा मूड सुधारण्यास मदत होईल. तसेच तुमचे मनही चार्ज होण्यास मदत होईल.