हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये ‘या’ तेलाचा वापर करा
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक हार्मेनल बदल होतात. त्यामुळे जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. परंतु जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. निरोगी शरीरासाठी तुमच्या आहारात योग्य तेलाचा वापर करणे गरजेचे असते. योग्य तेलाच्या वापरामुळे तुम्हाला हृदयविकाराच्या समस्या होत नाहीत आणि तुमचे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात पोषक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये प्रोटिन, फायबर, मिनिरल्स, पोटॅशियम आणि चांगले फॅट्स अशा घटकांचा समावेश करणे गरजेचे असते. निरोगी आहारामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. त्यासोबतच अनेक प्रकारचे विकार टळतात. परंतु आजकाल धवपळीच्या जीवनशैलीमुळे जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. जंक फूजमध्ये जास्त प्रमाणात तेलाचे वापर केले जाते ज्यामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यासोबतच जंक फूड बनवताना अनेकवेळा स्वच्छतेची देखील काळजी घेतली जात नाही ज्यामुळे संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते.
जंक फूडमध्ये वापरलेल्या तेलामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल, हृदयविकार आणि पोटा संबंधीत समस्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी तुम्हाला चांगल्या आणि निरोगी तेलाचा वापर करणे गरजेचे असते. तुमच्या दैनंदिन आहारात योग्य आणि नियमित तेलाचा वापर केल्यामुळे तुम्हाला हृदयासंबंधीत कोणत्याही प्रकारचे विकार होत नाही. चला जाणून घेऊया हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर केला पाहिजेल.
निरोगी हृदयासाठी ‘या’ तेलाचे वापर करा :
ऑलिव्ह ऑईलमध्ये भरपूर प्रमाणात चांगले फॅट्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्ररॉल आणि वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहिल्यामुळे तुमच्या हृदयाचे आोग्य निरोगी राहाण्यास मदत होईल. याशिवाय ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटिऑक्सिडेंट्स देखील असतात ज्यामुळे तुम्हाला कर्करोग, मधुमेह आणि अल्झायमर यांच्यासारख्या रोगाचा धोका कमी होतो.
सोयाबिन तेलामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. याशिवाय सोयाबिन तेलामध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते आणि तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत होतात.
सूर्यफूलाच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. सूर्यफूलाच्या तेलाच्या वापरामुळे हृदय विकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये सूर्यफूलाच्या तेलाचा वापर करू शकता.
निरोगी शरीरासाठी ‘या’ गोष्टी करा
हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा.
दिवसभरातून ७ ते ८ तासांची झोप घेतल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाते.
नियमित व्यायाम आणि योगा करा यामुळे हृदय निरोगी राहाते.
तुमच्या शरीरातील वजन नियंत्रित ठेवल्यास हृदयविकार होत नाही.