Health Tips: पचनशक्ती मजबूत करायची असेल तर अवलंबवा या चांगल्या सवयी

जर तुमची पचनसंस्था कमकुवत असेल तर त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. पचनक्रिया नीट होत नसेल तर अन्नाचे नीट पचन होत नाही व शरीराला पोषण मिळत नाही.

Health Tips: पचनशक्ती मजबूत करायची असेल तर अवलंबवा या चांगल्या सवयी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 11:30 AM

नवी दिल्ली – बदलती जीवनशैली आणि अनहेल्दी पदार्थ (unhealthy food) खाल्यामुळे पचनासंदर्भात समस्या निर्माण होणे हे आजकाल सामान्य झाले आहे. तुम्ही एखादा पदार्थ खाल्लात आणि त्याचे नीट पचन झाले नाही तर अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता, मळमळणे, पोटदुखी (stomach problems) असा त्रास होऊ शकतो. याकडे वेळेवर लक्ष दिले नाही तर हे आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमची पचनसंस्था आणि पचनशक्ती (digestion) मजबूत राहिली पाहिजे, त्यामुळे तुम्हाला पोटासंदर्भातील समस्या जाणवणार नाहीत. पचनशक्ती कशी वाढवावी हे जाणून घेऊया.

जंक फूडपासून दूर रहावे

पचनसंस्था मजबूत ठेवायची असेल, तर चरबीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करू नका. जंक फूड नियमितपणे खात असाल तर पोटाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. जंक फूडमध्ये साखर आणि चरबी जास्त प्रमाणात असते, त्याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही लठ्ठ होऊ शकता. तसेच पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुमची पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. वास्तविक, कमी प्रमाणात पाणी प्यायले तर नीट पचन होत नाही आणि बद्धकोष्ठता, गॅसेस, मळमळ,अपचन इत्यादी समस्या सुरू होतात. अशा प्रकारे तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसभरात थोड्या-थोड्या वेळाने पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेटेड ठेवावे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.

दही खावे

आपली पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी दही खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये चांगले बॅक्टेरिया आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी आणि इतर पोषक घटक पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दह्याचे सेवन करावे.

वेळेवर जेवावे

आजकाल बरेच लोक व्यस्त जीवनशैलीमुळे कधीही जेवतात, बऱ्याच वेळेस जेवणाची वेळ उलटून गेल्यानंतर उशीरा जेवण केले जाते. काही जण सकाळी नाश्ताही करत नाहीत. मात्र या सर्व गोष्टींचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे दररोजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर करावे. पौष्टिक आहार घेण्यावर भर द्यावा. सर्व भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.