Don’t worry, be happy… या 5 नैसर्गिक पद्धतींनी शरीरात वाढवा हॅपी हार्मोन्स
शरीरात हॅपी हार्मोन्स निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने आनंदी राहण्यास आणि चांगले वाटण्यास मदत होते. यासाठी तुम्ही काही उपायांचा अवलंब करू शकता.
नवी दिल्ली : ऑफिसचे दडपण, घरातील काम आणि इतर अनेक जबाबदाऱ्यांमुळे झालेल्या आपल्या व्यस्त जीवनात आनंदी आणि मानसिकदृष्ट्या शांत (mental peace) राहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हा ताण आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण करू शकतो. म्हणूनच आपली आंतरिक मन:शांती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. या आनंद आणि शांतीसाठी आपल्याला हॅपी हार्मोन्सची (happy hormones) गरज असते. आपल्या शरीरात 4 प्रकारचे हॅपी हार्मोन्स असतात. यामध्ये डोपामाइन (dopamine),ऑक्सिटोसिन (oxytocin), सेरोटोनिन (serotonin) आणि एंडॉर्फिन (endorphins) यांचा समावेश होतो… त्यांचा मानसिक आरोग्यावर लगेच परिणाम होतो. जर शरीरात या हार्मोन्सची कमतरता असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहते. हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी तुम्ही काही उपायांचा अवलंब करू शकता.
नैसर्गिक पदार्थांचे करा सेवन
नैसर्गिक पदार्थांचे सेवन केले पाहिजे. विशेषत: व्हिटॅमिन बीचा आहारात समावेश करावा. ब जीवनसत्त्व, मॅग्नेशिअम आणि लोह शरीरात हे सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन बी साठी सॅलमन (मासा), शेंगदाणे, पालक, ॲव्होकॅडो आणि लोह मिळावे यासाठी पालेभाज्या, डाळी, चणे, भोपळ्याच्या बिया, काजू यांचे सेवन करावे.
उपवास करा
उपवास केल्यानेही मूड बूस्ट करता येतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की उपवासामुळे मूड सुधारतो, यामुळे चिंता, थकवा आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते, एंडोर्फिन हार्मोनची पातळी 50% पर्यंत वाढवता येते.
सूर्यप्रकाश घ्या
सूर्यप्रकाश आपल्या शरीरात सेरोटोनिन हार्मोन्स वाढवण्यास मदत करतो. या हार्मोनच्या मदतीने तुम्ही तुमचा मूड वाढवू शकता.याशिवाय व्हिटॅमिन डीची कमतरता देखील पूर्ण होऊ शकते. तुमचा मूड वारंवार खराब होत असेल तर जास्त वेळ नाही पण कमीत कमी 5 मिनिटे तरी सूर्यप्रकाशात जाण्याचा प्रयत्न करा.
व्यायाम करा
तुम्हाला तुमचा मूड चांगला करायचा असेल आणि हॅपी हार्मोन्स वाढवायचे असतील तर नियमित व्यायाम करा. खरं तर, ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, अँटीडिप्रेसंट औषधे घेणाऱ्या पुरुष आणि स्त्रियासलग चार महिने ॲरोबिक्स केल्यावर त्यांच्या मूडमध्ये खूप चांगली सुधारणा दिसून आली. खरं तर, व्यायामाद्वारे टेलोमेरेज संरक्षित केले जाऊ शकते. नियमित सायकल चालवणे, ब्रिस्क वॉक करणे किंवा इतर पद्धतींनी व्यायामाचा तुमच्या दिनक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न करा. तसेच व्यायाम केल्यानंतर, एंडोर्फिन हार्मोन शरीरात सोडला जातो, ज्यामुळे आनंदी हार्मोन्सची पातळी वाढते.
मेडिटेशन करा
मेडिटेशन करूनही मन आणि मन शांत राहते. यामुळे तुम्हाला आराम वाटतो. त्यासोबत मेंदू चांगले काम करू लागतो. यामुळे सेरोटोनिनची पातळी वाढते आणि तुम्हाला आतून आनंदी वाटते.
असेही वाढवू शकता हॅपी हार्मोन्स
जे लोक तुम्हाला हसवतात आणि ज्यांच्यासोबत आनंदी वाटतं अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हसता तेव्हा एंडॉर्फिन संप्रेरक वेगाने बाहेर पडतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुमच्या आवडीचे पदार्थ खा, तुमच्या आवडीचे काम करा, एखादा छंद जोपासा, चांगली झोप घ्या, यामुळे तुमचे आनंदी हार्मोन्स वाढू शकतात.