Monsoon care : डॉक्टरांचा हा सल्ला पाळाल तर पावसाळ्यात कमी आजारी पडाल
पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडूनन लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो . काही टिप्स फॉलो केल्यास आजारी पडण्याचा धोका कमी होतो.
Diseases in Monsoon : पावसाळ्याचा (monsoon) ऋतू कितीही आल्हाददायक असला तरी त्यासोबत असंख्य आजारांचा धोकाही येतो. घाण पाणी आणि खराब अन्न यामुळे शरीरात धोकादायक बॅक्टेरिया (bacteria) प्रवेश करू शकतात. यामुळे अनेक आजारही (monsoon diseases)होऊ शकतात. या ऋतूमध्ये आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर ताप येणे, व्हायरल, न्युमोनिया, टायफॉईड, फंगल इन्फेक्शन, स्किन डिसीज आणि सर्दी-खोकला यांसारखे आजार सहज होऊ शकतात. त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर हे आजार घातक स्वरूपही धारण करू शकतात.
पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडूनन लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. इन्फेक्शनपासून बचाव कसा करावा ते जाणून घ्या.
स्ट्रीट फूड खाऊ नका
ज्येष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या ऋतूतील बहुतेक आजार हे खराब अन्नामुळे होतात. या ऋतूत ठेवलेल्या अन्नात बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. असे अन्न खाल्ल्याने ते (बॅक्टेरिया) शरीरात प्रवेश करतात आणि लोक रोगाला बळी पडतात. म्हणूनच या ऋतूत रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. फक्त घरी शिजवलेले, स्वच्छ अन्न खाण्याचा प्रयत्न करा.
आहाराची काळजी घ्या
पावसाळ्यात खाण्यापिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आहारात प्रथिने आणि फायबर यांचा समावेश करावा. सकाळी पोटभर जेवावे आणि दुपारी फळे खावीत.
पुरेशी झोप घ्यावी
या ऋतूमध्ये चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. रात्री वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी वेळेवर उठा. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी आठ तासांची झोप घेतली पाहिजे. रात्री खूप जास्त जेवू नका. तसेच झोपण्याच्या काही तास आधी तुमचा फोन वापरणे थांबवावे
ताप आल्यास डॉक्टरांना दाखवा
बहुतेक व्हायरल इन्फेक्शन्स ही तापाने सुरू होतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ताप येत असेल आणि तो दोन दिवसांपेक्षा जास्त काळ असेल तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. या परिस्थितीत स्वत:च्या मनाने औषधोपचार करणे टाळा. दिवसातून दोनदा शरीराचे तापमान तपासा. जर 100 पेक्षा जास्त ताप असेल तर उपचारांची आवश्यकता आहे.