Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : थंडीपासून वाचण्यासाठी ‘या’ पदार्थांचा खाण्यात करा समावेश, शरीर राहिल गरम!

Health News : शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी काही पदार्थांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपलं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होईल आणि आपले शरीर तंदुरस्त राहण्यास मदत होईल. तर आता आपण रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे, याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून हिवाळ्यात आपलं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होईल.

Health : थंडीपासून वाचण्यासाठी 'या' पदार्थांचा खाण्यात करा समावेश, शरीर राहिल गरम!
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 10:16 PM

मुंबई : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, तर थंडीच्या या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप असे आजार निर्माण होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे खूप गरजेचं असतं. मग आपले कपडे असो आहार असो अशा प्रत्येक गोष्टींमध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं. त्यात हिवाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे प्रत्येकाने योग्य तो आहार घेणे गरजेचे आहे.

मध – मध खायला गोड आणि चविष्ट असते. तर हेच मध तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये मधाचा तुमच्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. मधामध्ये उष्णता वाढवण्याचे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर मध उपयुक्त ठरते. मध आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास देखील मदत करते. त्यामुळे मधाचा आपला आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

गूळ – गुळ खायला बहुतेक लोकांना आवडते. तसेच गूळ हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या आहारात गुळाचा समावेश करतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा गुळाचा समावेश आपल्या आहारात करणं खूप फायदेशीर ठरतं. गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता टिकून राहते. तसेच आपल्या शरीराला लोह देखील मिळते. त्यामुळे गूळ खाणे खूप फायदेशीर ठरते. तसेच गुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास देखील मदत होते.

तूप – तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे हिवाळ्यात तुपाचा समावेश आहारात करणं खूप गरजेचं असतं. तूप खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच आपले सर्दी, खोकल्यापासून देखील संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये तुपाचा समावेश तुमच्या आहारात आवर्जून करा.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.