हिवाळ्यात घरगुती तूपापासून या आरोग्याच्या समस्यांपासून मिळेल सुटका

तूप आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात हेल्दी फॅक्ट असतात. सांधेदुखी, सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी तूप रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्ही हिवाळयात घरगुती तुपापासून काही टिप्स तरी केल्या तर तुम्हाला आरोग्याच्या या समस्यांपासून सुटका मिळेल.

हिवाळ्यात घरगुती तूपापासून या आरोग्याच्या समस्यांपासून मिळेल सुटका
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 7:39 PM

हिवाळा सुरू होताच लोकांना अनेकदा सर्दी, खोकला, त्वचा कोरडी पडणे आणि सांधेदुखी सारख्या सामान्य समस्यांच्या तक्रारी होऊ लागतात. इतकंच नाही तर या समस्यांना सामोरे जाण्यासाठी लोकं विविध उपाय करत असतात, पण त्यातूनही त्यांना फारसा फरक पडत नाही आणि समस्या तशीच राहते. अशावेळी तुम्हीही यापैकी कोणत्याही समस्येशी झगडत असाल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती साजूक तुपाचा वापर करा. जेव्हा जेव्हा घरगुती उपाय करून पाहण्याची चर्चा होते, तेव्हा त्या यादीत घरगुती साजूक तुपाचे नाव प्रथम येते. आयुर्वेदातही शतकानुशतके तूपाचा वापर केला जात आहे.

देशी तुपाचे असे अनेक फायदे आहेत, ज्याच्या मदतीने तुमची समस्या सहज दूर होते. तूप हा हेल्दी फॅक्टचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. तूप आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात ओमेगा -3 फॅटी ॲसिड देखील असतात.

तुपाचा असा होतो फायदा

थंडीच्या दिवसात तुम्ही तुमच्या आहारात साजूक तुपाचा समावेश नक्की करा. कारण याच्या सेवनाने तुमच्या आरोग्याला हंगामी आजारांपासून संरक्षण मिळेल. कारण तूपात असलेले फॅक्ट शरीराला उबदार ठेवण्यास आणि ऊर्जा देण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के समृद्ध तूप रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तसेच हिवाळयात तुमची पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर तुपाच्या सेवनाने तुमची दृष्टी वाढवण्याचे काम करते. याशिवाय तूप स्नायूंना निरोगी ठेवते आणि शरीरातील अशुद्धी दूर करते.

हे सुद्धा वाचा

खोकला बरा करण्यासाठी आहारात करा तुपाचा वापर

थंडीच्या दिवसात जास्त आंबट किंवा तेलकट पदार्थाचे सेवन झाल्याने खोकला होतो. यासाठी तुम्हाला जर थंडीत खूप जास्त खोकला होत असेल तर घरगुती तुपाची ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. एक चमचा गरम तुपात चिमूटभर काळी मिरी किंवा हळद मिसळून खा. असे केल्याने घशातील जळजळ शांत होण्यास आणि खोकला कमी होण्यास तुम्हाला खूप मदत होईल.

कोरडी त्वचा सुधारण्यास तूप मदत करते

हिवाळ्यात अनेकांची त्वचा हि कोरडी पडत असते. यासाठी तुम्ही अनेक प्रॉडक्ट विकत घेऊन त्वचेवर लावत असतात पण थोड्यावेळात पुन्हा त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात होते. यासाठी तुम्ही तुमच्या घरातील साजूक तुपाचा वापर करू शकता. तळहातावर थोडे गरम तूप घेऊन चेहऱ्यावर लावा आणि नंतर चांगली मसाज करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ही प्रक्रिया करा. यामुळे तुमची समस्या लवकरच दूर होईल. तूप त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या तर दूर होईलच शिवाय तुमच्या त्वचेचे पोषणही होईल.

तूपामुळे ॲलर्जी दूर होते

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर तुम्ही तुमच्या आहारात तुपाचा जरूर समावेश करा. ब्युटिरिक ॲसिडने समृद्ध असलेले तूप ॲलर्जी कमी करण्यास मदत करते. दररोज योग्य प्रमाणात तूपाचे सेवन करून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. याशिवाय तूप हे एनर्जी बूस्टर देखील आहे.

सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुपाचा वापर करा

तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात तुपाचा समावेश करा कारण तुपात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे सांधेदुखीपासून आराम देतात. सांधेदुखी कमी करण्यासाठी गरम तुपात आल्याची पावडर किंवा अजमोदा मिसळून खावे. याशिवाय सांध्यावर तुपाचा मालिशही करून तुम्हाला आराम मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.