अहमदनगर : अहमदनगरला (Ahmadnagar) एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा (H3N2 Influenza) या संसर्गजन्य आजारामुळे महाराष्ट्रात (maharashtra)पहिला बळी गेला आहे. तर देशात तिसरा मृत्यू (third death in the country) झाल्याने खळबळ उडाली आहे. एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला संसर्गजन्य आजाराची लागण झाली होती. त्यानंतर तरुणावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हा तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या संसर्गजन्य आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तरुणाचा मृ्त्यू झाल्यामुळे कुटुंबियांना आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या संसर्गजन्य आजारामुळे औरंगाबादमधील रहिवासी असलेल्या तरुणाचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला आहे. तो विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. नगरमध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या तो अहमदनगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. मागील आठवड्यात तो ट्रीपसाठी कोकणात गेला होता. ट्रिपवरून आल्यानंतर तो आजारी पडला, त्याची कोवीड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तर त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात रविवारी उपचारासाठी दाखल केले. तेथील तपासणीत कोवीड 19 सोबतच एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. नंतर नगर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व हॉस्पिटल मधील डॉक्टरांची एक बैठक तातडीने बोलवली. तसेच शहरातील नागरिकांनी काळजी घ्यावी मास्क घालण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. त्याचबरोबर राज्यात सुध्दा संसर्गजन्य अधिक रुग्ण असल्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. लोकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून हवामानामध्ये बदल झाल्यामुळे विविध आजार उद्धभवले आहेत. त्याचबरोबर राज्यात विविध ठिकाणी पाऊस सुद्धा सुरु आहे.