तुम्हालाही आहे का टॉयलेटमध्ये फोन वापरण्याची सवय ? होऊ शकते नुकसान
तुम्हालाही वॉशरूम किंवा टॉयलेटमध्ये फोन वापरण्याची सवय असेल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
नवी दिल्ली – मोबाईल हा (use of mobile) आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कधी कामासाठी तर कधी टाइमपास करण्यासाठी सर्व लोक फोनचा सर्रास वापर करतात. साधारणपणे प्रत्येक व्यक्तीलाच फोनची सवय झालेली असते आणि कितीही इच्छा असली तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. मात्र मोबाईल वापराचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आजकाल लहान मुलांनाही स्मार्ट फोनचे व्यसन (habit) लागले आहे. मोबाईलचा जास्त वापर करणे ही वाईट सवय आहे. आजकाल बरेचसे लोक वॉशरूम किंवा बाथरूममध्येही (using phone in toilet) फोन घेऊन जाण्याची चूक करताना दिसतात.
वेळेची बचत करणे हे टॉयलेटमध्ये फोन वापरण्यामागचे कारण मानले जाते. पण ही सवय आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
संसर्गाची भीती
टॉयलेट किंवा बाथरूम ही घरातली अशी जागा आहे, जिथे खराब बॅक्टेरिआचा सतत वावर असतो. बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुणे हे खूप महत्वाचे आहे. परंतु जर तुम्ही तिथे फोन घेऊन गेलात आणि तो सॅनिटाइज न करता वापरला तर त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. यामुळे केवळ आरोग्यच धोक्यात येत नाही तर आपल्या त्वचेलाही इन्फेक्शन होऊ शकते.
होऊ शकतो मूळव्याध
तुम्हाला माहीत आहे का टॉयलेटमध्ये फोन वापरल्यास पाईल्स म्हणजेच मूळव्याध होण्याचा धोका असतो. लोक टॉयलेटमध्ये बराच वेळ फोन वापरतात आणि ते तिथे इथका वेळ घालवतात की काही वेळेस त्यांचे पाय सुन्न होतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, यामुळे गुदाशयावर दबाव येतो. ही चूक सतत करणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
डायरियाचा त्रास
टॉयलेटमध्ये फोन वापरल्यानेही डायरियाही होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही आरोग्याची एक गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये संबधित व्यक्तीला उलट्या आणि जुलाब होतात. डायरिया होण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब बॅक्टेरिआ. टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने फोनच्या स्क्रीनद्वारे हा बॅक्टेरिआ आपल्या शरीरात पोहोचतो व त्याचा आपल्याला त्रास होतो.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)