Hair Loss affects Mental Health : केसगळतीच्या समस्येचा मानसिक आरोग्यावर होऊ शकतो परिणाम, कसं ते जाणून घ्या

केस गळत असतील तर त्याचा केवळ महिलांवरच नव्हे तर पुरषांवरही प्रभाव पडतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या केस हे शरीराच्या प्रतिमेचा एक भाग आहेत आणि त्यातील कोणतेही बदल हे थेट एखाद्या व्यक्तीचे विचार, भावना आणि वर्तनातील बदलांशी संबंधित असतात.

Hair Loss affects Mental Health : केसगळतीच्या समस्येचा मानसिक आरोग्यावर होऊ शकतो परिणाम, कसं ते जाणून घ्या
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 9:13 AM

नवी दिल्ली – केस विंचरताना कंगव्यावर जास्त केस दिसले तर लगेच चिंता (feeling worried) वाटू लागते, यावरूनच आपल्या डोक्यावरील केस हे आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत, याचा अंदाज येतो. अनेकवेळा आपण आपल्या केसांद्वारे आपला मूड दर्शवण्याचा प्रयत्न करतो. केस गळण्याचा (hair loss) त्रास होत असेल तर हे केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही (affect on men and women) प्रभावित करते.

मानसशास्त्रीयदृष्ट्या केस हे शरीराच्या प्रतिमेचा एक भाग आहेत आणि त्यातील कोणतेही बदल हे थेट एखाद्या व्यक्तीचे विचार, भावना आणि वर्तनातील बदलांशी संबंधित असतात. डोक्यावरील दाट केस हे तारुण्य, जोम, लैंगिक आकर्षण आणि तारूण्याचे लक्षण म्हणून पाहिले जाते. तर केसगळतीशी संबंधित सर्वात सामान्य मानसिक समस्यांमध्ये तणाव, चिंता, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, कमी आत्मसन्मान, कमी लैंगिक इच्छा, सामाजिक भीती आणि अगदी आत्महत्येचे विचार यांचा देखील समावेश आहे.

केस पातळ होण्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो आणि बहुतांश वेळेस निराश वाटणे, मत्सर, लाजिरवाणे वाटणे, अशा भावना निर्माण होतात आणि या सर्व गोष्टी मुख्यतः सामाजिक दबावामुळे होतात. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये अनुवांशिक विकार, हार्मोन्समध्ये बदल होणे, वृद्धत्व, बाळंतपण, रजोनिवृत्ती, थायरॉईड, जुनाट आजार, कॅन्सरवरील उपचार, इन्सुलिन प्रतिरोधकता, भावनिक आणि मानसिक ताण असणे, योग्य व पौष्टिक आहाराचा अभाव अशा अनेक कारणांचा त्यात समावेश असू शकतो. यापैकी मानसिक व भावनिक ताण या दोन्ही गोष्टी केसगळतीसाठी कारणीभूत ठरू शकतात आणि तेच केसगळतीचे लक्षणही असते.

हे सुद्धा वाचा

केसगळतीचा परिणाम इतका गंभीर असतो की बहुतेक रुग्णांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. ते आपलं डोकं किंवा स्काल्प हे टोपी किंवा स्कार्फखाली लपवतात, बाहेर , लोकांमध्ये जाणे टाळतात आणि बाहेर जाऊन करण्याच्या कामांवरही मोठ्या प्रमाणात मर्यादा घालतात. केस पातळ होणे आणि केस गळणे यामुळे व्यक्तींना साधारणपणे दोन प्रकारचे विकार होतात –

1) ॲडजस्टमेंट डिसऑर्डर

हे प्रामुख्याने केस गळण्याच्या तीव्रतेशी संबंधित असते आणि ( केसगळती) उदास वाटणे व निराशेच्या भावनांसाठी कारणीभूत ठरते. हा त्रास असलेला रुग्ण तणावग्रस्त होतो आणि त्याच्या या स्वरुपातील बदलामुळे चिंताग्रस्त होतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो.

2) पर्सनॅलिटी डिसऑर्डर

रुग्णाला त्याच्या शरीरात मोठी कमतरता जाणवू लागते. केसांवर उपचार करण्याचा निर्णय घेणारे बहुतांश रुग्ण हे स्व-प्रतिमा सुधारण्याच्या इच्छेपायी असे करतात.

त्याच वेळी, पुरुषांपेक्षा महिला (केसगळतीच्या) या समस्येशी अधिक संघर्ष करतात कारण चांगले व जाड केस म्हणजे त्यांचे सौंदर्य असते (असे त्यांना वाटते). पण मानसिक आरोग्य आणि केस गळणे तसेच त्याच्या रुग्णाच्या जीवनावर होणारा परिणाम अथवा प्रभाव यातील संबंध समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच येथे काही गोष्टी समजून घेणे महत्वाचे ठरते –

या वेदनांशी अधिक संघर्ष करतात कारण त्यांचे सौंदर्य म्हणजे चांगले आणि जाड केस. परंतु हे समजून घेणे आवश्यक आहे की मानसिक आरोग्य आणि केस गळणे आणि त्याचा रुग्णाच्या जीवनावर होणारा मोठा परिणाम यांच्यातील संबंध समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच येथे काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे-

– केसगळतीच्या प्रत्येक समस्येवर उपचार केला जाऊ शकत नाहीत आणि प्रत्येक उपलब्ध उपचारांचा एखाद्या विशिष्ट केसमध्ये परिणाम होईलच असेही नाही.

– काही केस गळणे हे अपरिवर्तनीय असले तरी भविष्यात केसगळती टाळण्यासाठी उपचार करता येऊ शकतात.

– केस गळतीच्या समस्येवर उपचार केले तरी त्याचे परिणाम दिसून येण्यासाठी सुमारे 3 ते 6 महिने लागतात.

– वेगवेगळ्या रूग्णांसाठी भिन्न उपचार असतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीसाठी एकच उपचार योग्य ठरेल आणि ठराविक वेळेतच त्याचा परिणाम दिसून येईल असे नाही.

– केसगळती टाळण्यासाठी काही उपचार दीर्घकाळ चालू ठेवावे लागतात.

– यशस्वी परिणाम हवे असतील तर त्यासाठी योग्य निदान आणि योग्य डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.