Happy Chocolate Day 2023 : प्रत्येक वेळी खात असाल चॉकलेट तर आरोग्याचे होईल हे नुकसान

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली असून रोझ डे, प्रपोझ डे नंतर आज, म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी चॉकलेट डे साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तींना चॉकलेट दिले जाते. मात्र चॉकलेटच्या जास्त सेवनाने अनेक दुष्परिणामही होऊ शकतात, त्याबद्दल जाणून घेऊया.

Happy Chocolate Day 2023 : प्रत्येक वेळी खात असाल चॉकलेट तर आरोग्याचे होईल हे नुकसान
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 9:12 AM

नवी दिल्ली : सध्या व्हॅलेंटाईन वीकची (valentines week) धामधूम सुरू असून लवकरच व्हॅलेंटाईन डे येईल. हा संपूर्ण आठवडाच प्रेमी जोडप्यांसाठी खूप खास असतो. रोज डे, प्रपोज डे नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी चॉकलेट डे (chocolate day) साजरा केला जातो. प्रत्येक नात्यात गोडवा आणण्यासाठी चॉकलेट खूप महत्त्वाचं असतं, पण जेव्हा तुमच्या मनातील गोष्टी शेअर करण्याचा विचार येतो तेव्हा चॉकलेटचं महत्त्व आणखीनच वाढतं. प्रेम व्यक्त करायचं असेल, कोणाल मनवायचं असेल तर फुलांसाह चॉकलेटचा पर्याय असतो, एखाद्या सेलिब्रेशनसाठीही (celebration) चॉकलेट खाऊन तोंड गोड केलं जातं. सणासुदीच्या काळातही आपण नातेवाईक किंवा मित्रमंडळींना भेट म्हणून चॉकलेट देतो. हे खाण्याचे अनेक फायदे आहेत

चॉकलेट हे अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मांनी युक्त असते, जे आपल्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर ठरते. पण चॉकलेटच्या जास्त सेवनाने अनेक दुष्परिणामही होऊ शकतात. ते कोणते हे जाणून घेऊया.

1) हाडं कमकुवत होऊ शकतात

हे सुद्धा वाचा

जास्त चॉकलेट खाल्ल्यास आपली हाडं कमकुवत होऊ शकतात. एका रिपोर्टनुसार, चॉकलेटमुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. जर तुम्ही मर्यादित प्रमाणात चॉकलेटचे सेवन केले तर त्यामुळे नुकसान होत नाही. मुळात कोणतीही गोष्ट प्रमाणात केली तर त्रास होतच नाही, पण एका मर्यादेबाहेर गोष्ट गेली की त्याचे दुष्परिणाम होतातच. म्हणूनच चॉकलेटचे सेवनही एका ठराविक प्रमाणात आणि कधीतरीच करावे.

2) वजन वाढते

हो, हे खरं आहे. चॉकलेट खाल्ल्याने वजन वाढू शकतं. जर तुम्ही जास्त चॉकलेट खाल्ले तर तुम्ही लठ्ठ होऊ शकता. वास्तविक, त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर चॉकलेटही कमी प्रमाणातच खावे.

3) निद्रानाशाचा त्रास

अनेकांना चॉकलेट इतके आवडते की ते रात्री झोपण्यापूर्वी किंवा झोपल्यावर मध्येच जाग आली तर उठल्यावरही चॉकलेट खातात. तुम्हीही असे केल्यास निद्रानाशााचा त्रास होतो. चॉकलेटमध्ये कॅफिन असते. हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो.

4) गॅसेसची समस्या

जर तुम्हाला आधीपासूनच गॅसेसची समस्या असेल तर चॉकलेट खाणे टाळावे. गॅसेस, ॲसिडिटी अशा समस्यांमध्ये चॉकलेट न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात असलेल्या कोको पावडरमुळे गॅस होतो. त्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. शरीराला होणारा त्रास टाळायचा असेल तर अशा व्यक्तींनी चॉकलेटचे सेवन न केलेले उत्तम ठरते.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.