तुम्ही कधी कच्च्या खाद्यपदार्थांचा डाएट ट्राय केला आहे का? जाणून घ्या वनस्पतीआधारीत पोषणाचे फायदे
बाहेरचे खाद्यपदार्थ आपली भूक तात्पुरती शमवतात. मात्र या खाद्यपदार्थांचा आपल्या पचन प्रक्रियेवर दिर्घकाळाचा परिणाम दिसून येतो. ते पदार्थ आपली भूक अधिक काळ शमवू शकत नाहीत. (Have you ever tried a raw food diet, know the benefits of plant-based nutrition)
मुंबई : योग्य आणि चांगले पोषण प्रत्येक मनुष्याच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते. आपल्या सर्वांना हे माहित आहे की, दीर्घ काळ निरोगी रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवण्यासाठी पोषण अधिक सक्रिय भूमिका निभावते. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात काही गोष्टींचे पालन करणे अधिक गरजेचे आहे. या गोष्टी म्हणजे आपला आहार अधिक पौष्टिक कसा असेल, याकडे विशेष लक्ष देणे. (Have you ever tried a raw food diet, know the benefits of plant-based nutrition)
जंक फूडचा पचनक्रियेवर परिणाम
आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी टिकवणे फार मोठे आव्हान बनले आहे. तसेच व्यवसायात प्रगती करणे व व्यवसायात टिकून राहणेही मुश्किल बनले आहे. त्यामुळे नोकरी टिकवायची असेल तर नोकरदार लोकांना जवळजवळ 12 तास ऑफिसमध्ये कामात गुंतून राहणे क्रमप्राप्त बनले आहे. अशा लोकांच्या बाबतीत आरोग्याच्या विविध समस्या आहेत. हे लोक पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्वे असलेले पदार्थ खाणे सोडून देतात. किंबहुना वेळेअभावी ते पदार्थ उपलब्ध करून खायला त्यांना शक्य नसते. हे लोक आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये जंक फूड आणि बाहेरच्या जेवणाचे सेवन करतात. अशाप्रकारचे बाहेरचे खाद्यपदार्थ आपली भूक तात्पुरती शमवतात. मात्र या खाद्यपदार्थांचा आपल्या पचन प्रक्रियेवर दिर्घकाळाचा परिणाम दिसून येतो. ते पदार्थ आपली भूक अधिक काळ शमवू शकत नाहीत.
वनस्पती-आधारीत पोषणाचे सेवन करणे फायदेशीर
शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्वांची गरज असते. ज्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात, अशा पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायला पााहिजे. आपल्या जेवणातून जर आपणाला पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्वे मिळाली नसतील, तर आपण जेवल्यानंतर काही वेळेनंतर पुन्हा भूक लागते. आपल्या आहारात ठराविक प्रमाणात बदल केल्याने आपले आरोग्य सुधारू शकते आणि आपल्याला दीर्घकाळ निरोगी ठेवता येते. स्मार्ट ग्रीन्समध्ये (प्लान्ट-बेस्ड न्यूट्रिशन ब्रँड) लोकांना दररोजच्या जीवनशैलीमध्ये वनस्पती-आधारीत पोषणाचे सेवन करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. कारण वनस्पती-आधारीत अन्न कोणत्याही हानिकारक रसायनाशिवाय नैसर्गिक स्त्रोतांकडून प्राप्त केले जाईल.
वनस्पती-आधारीत पौष्टिकतेचे अनेक फायदे
वनस्पती-आधारीत पौष्टिकतेचे अनेक फायदे आहेत. यामुळे नैसर्गिकरित्या आपले वजन टिकवून ठेवण्यास मदत होते. तसेच रोगांपासून आपले संरक्षण होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. यात साखर नसते तसेच इतरही बरेच फायदे आहेत.
कच्चे अन्न खाण्याचे आरोग्यदायी फायदे
– कच्चे खाद्यपदार्थ पचनासाठी चांगले असतात. कच्चे खाद्यपदार्थ आणि शाकाहारी आहार आपल्या पचन प्रक्रियेसाठी आणि पोटासाठी फायदेशीर ठरू शकतात.
– वनस्पती-आधारीत पदार्थ म्हणजे प्रक्रिया न केलेल्या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने असतात. कच्च्या खाद्यपदार्थांमध्ये काजू, शेंगदाणे, सोयाबीन अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. हे खाद्यपदार्थ आपल्या रोजच्या पदार्थांमध्ये समाविष्ट करणे अत्यंत निरोगी असते. ते आपल्याला तंदुरुस्त राहण्यास मदत करतात. तसेच विविध व्याधी दूर करतात.
वजन कमी करण्यास मदत करते
न शिजवलेले अन्न वजन कमी करण्यास मदत करू शकते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी एखादा खास आहार शोधत असाल तर वनस्पती आधारीत अन्न आणि कच्चे अन्न खाण्याचा विचार करा. हाच तुमचे वजन कमी करण्यावर विशेष उपाय ठरू शकतो. त्याचबरोबर शरीरातील चरबी कमी करण्यासही याची मौलिक मदत होऊ शकते. (Have you ever tried a raw food diet, know the benefits of plant-based nutrition)
कोरोना लसीचा डोस घेण्यापूर्वी भरपूर पाणी प्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा काय आहे सल्लाhttps://t.co/qSx6qyCQ98#corona |#vaccine |#expert |#advice |#drink |#water
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2021
इतर बातम्या
जळगावच्या जामनेर पंचायत समितीत कोट्यवधींचा घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप, उपोषण सुरु