Benefits of Dates: हृदय निरोगी ठेवते, मासिक पाळीच्या वेदनाही होतात कमी, खजूर खाण्याचे ‘ हे ‘ आहेत 5 फायदे !

खजूर हे पोषक तत्वांनी समृद्ध असे ड्राय फ्रुट आहे. खजुरामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन्स, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि लोह मुबलक प्रमाणात असते.

Benefits of Dates: हृदय निरोगी ठेवते, मासिक पाळीच्या वेदनाही होतात कमी, खजूर खाण्याचे ' हे ' आहेत 5 फायदे !
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 12:08 PM

दररोज एक मूठभर खजूर (dates) खाल्ल्यास आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या दूर होतील. खजुरामध्ये अनेक पोषक तत्वं (nutrition) असतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन्स, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि लोह मुबलक प्रमाणात असते. खजूर खाण्याचे शरीराला अनेक फायदे (benefits) मिळतात. त्याच्या नियमित सेवनामुळे ताकद वाढते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच महिला व पुरुषांमधील प्रजनन समस्या दूर होते. खजूर खाल्ल्याने नियमित मासिक पाळी येते व मासिक पाळीच्या वेदनांपासून (reduces period cramps) आरामही मिळतो.

मेडिसिननेट नुसार, 100 ग्रॅम खजुरामध्ये 314 कॅलरीज, 214 ग्रॅम प्रोटीन्स (प्रथिने) , 0.38 ग्रॅम फॅट्स, 80.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि 6.7 ग्रॅम फायबर असते. खजुराचे नियमितपणे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

खजूर खाण्याचे फायदे –

हृदयरोगाचा धोका कमी होतो –

खजुरामध्ये पुरेशा प्रमाणात डाएटरी फायबर असते. त्यामुळे एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. आहारातील फायबर रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्ऱॉल शोषून घेते. या कारणामुळे खजुराचे सेवन करणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो.

पचनासाठी मदतशीर –

खजूरमध्ये असलेल्या उच्च विद्राव्य फायबरमुळे, तो पचनासाठी उत्तम ठरतो. खजूराचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता, अतिसार आणि पाचन तंत्राचा दाह किंवा सूज रोखली जाऊ शकते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो –

खजुरात असलेले पोटॅशिअम, हे शरीरातून सोडिअम काढून टाकण्यास मदत करते. अशा प्रकारे पोटॅशिअम शरीरातील सोडियम काढून रक्तदाब नियंत्रित करते. यामुळे हृदयाचे ठोके संतुलित राहतात.

रक्ताची कमतरता निर्माण होत नाही –

खजूरात लोह मोठ्या प्रमाणात असते, जे लाल रक्तपेशींच्या उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरते. लाल रक्तपेशींच्या निर्मितीमुळे ॲनिमियाचा धोका कमी होतो. आणि थकवा, अशक्तपणा ही ॲनिमियाशी संबंधित लक्षणेही रोखली जातात.

मासिक पाळीच्या वेदना कमी होतात –

महिलांनी खजूर जरूर खावा. अनेक अभ्यासांतून असे समोर आले आहे की, खजूरात असलेल्या तत्वांमुळे मासिक पाळीच्या समस्य दूर होतात तसेच ती नियमित येते. खजूर खाल्याने मासिक पाळीच्या वेदनाही कमी होतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.