Health Tips : हलासन करा, मणक्याच्या आणि पाठीच्या दुखण्यापासून कायमचा आराम मिळवा!
हलासन हे मध्यम स्तराचे योगासन आहे. ज्यामध्ये गरजेनुसार काही बदलही करता येतात. हलासन हे एक असे योगासन आहे ज्यामुळे शरीर तर मजबूत होतेच पण स्नायू देखील बळकट होतात. त्यासोबतच मेंदू आणि डोळे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांनाही निरोगी ठेवण्यास मदत होते.
मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या आरोग्याकडे (Health) लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. आपल्या शरिराला बळकट ठेवण्यासाठी आणि शरिर सुदृढ ठेवण्यासाठी योगा (Yoga) करणं आवश्यक आहे. यात हलासन (Halasana) हे आसन महत्वपूर्ण ठरतं. त्याचे शरिरावर सकारात्मक परिणाम होता. दररोज हलासन केल्यास शरिर अधिक लवचिक बनते. तज्ज्ञांच्या मते, हलासन हे मध्यम स्तराचे योगासन (Yogasana) आहे. ज्यामध्ये गरजेनुसार काही बदलही करता येतात. हलासन हे एक असे योगासन आहे ज्यामुळे शरीर तर मजबूत होतेच पण स्नायू देखील बळकट होतात. त्यासोबतच मेंदू आणि डोळे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांनाही निरोगी ठेवण्यास मदत होते.
हलासन कसे करावे?
बऱ्याच लोकांना आपल्या उत्तम आरोग्यासाठी हलासन करणं गरजेचं वाटतं पण ते कसं करावं हे लक्षात येत नाही. तर हलासन करण्यासाठी सर्व प्रथम, स्वच्छ वातावरणात आणि सपाट ठिकाणी चटई किंवा योगा मॅट अंथरा. आता यावर तुमच्या पाठीवर झोपा आणि तुमचे दोन्ही हात चटईवर ठेवा. आता हळूहळू पाय सरळ रेषेत वर करा. नंतर कंबरेच्या मदतीने तुमचे पाय डोक्याच्या मागच्या बाजूला घ्या. तुमचे पाय जमिनीला स्पर्श करेपर्यंत ते डोक्याच्या मागे घ्या.आता तुमच्या क्षमतेनुसार या आसनात राहा.मग आपल्या सामान्य स्थितीत परत या. हे योगसन दिवसातून पाच वेळा करा.
हलासनाचे फायदे
हलासनाच्या नियमित सरावाने मनाला शांती मिळते. यामुळे मणक्याची लवचिकता वाढते आणि पाठदुखीमध्ये आराम मिळतो. हलासनाचा सराव तणाव आणि थकवा हाताळण्यास देखील मदत करतो. हलासनामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. हे पाचन तंत्राच्या अवयवांना मालिश करते आणि पचन सुधारण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे सर्वोत्तम आसन आहे, कारण ते साखरेची पातळी नियंत्रित करते. या आसनामुळे मणक्याला आणि खांद्यांना चांगला ताण येतो. तसेच थायरॉईड ग्रंथीशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या
Health Benefits Of Flax Seeds : सुपर फूड अळशी, रोज 1 चमचा अळशी खाल्ल्याने होतील चमत्कारिक फायदे
सावध व्हा! कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, ‘या’ शहरांमधील मुलं होताय बाधित
गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य…असे होतात शारीरिक बदल