थंडीच्या दिवसात छातीत कफ झाला? ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा

जास्त जड अन्न, वेळेवर न खाणे किंवा औषधे घेणे आणि पाण्याची कमतरता ही कफ जास्त होण्याची कारणे आहेत. थंडीत कफ झाल्यास पोट नीट साफ होत नाही आणि आतड्यांच्या हालचालींमध्ये खूप त्रास होतो. यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत.

थंडीच्या दिवसात छातीत कफ झाला? 'हे' घरगुती उपाय करून पाहा
cough
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 1:07 PM

हिवाळा सुरु झाला की अनेकांना या दिवसांमध्ये हंगामी आजारपण होत असतात. अश्यातच थंडीत सर्वात जास्त समस्या ही कफ होण्याची होत असते. लहान मुलांपासून ते वृद्धांना या समस्यांना सामोरे जावे लागते. तर काहीजण असे ही आहेत ज्यांना थंडीत थंड पदार्थ खाल्याने सुद्धा त्यांना कफ लगेच होतात. तर कफामुळे पोट नीट साफ होत नाही आणि यामुळे दिवसभर पोटात दुखणे, मळमळ सारखं वाटणे अश्या समस्या उद्भवू लागतात. ज्यामुळे दिवसभरात आपल्या कामात लक्ष लागत नाही.

हिवाळ्यात कफ समस्या होण्याची सामान्य

कफामुळे आतड्यात घाण जमा होते आणि पचनसंस्थेवर याचा परिणाम होत असतो. त्यामुळे ही समस्या कायम राहिल्यास स्थिती गंभीर देखील होऊ शकते. यामुळे मूळव्याधाचा धोकाही वाढतो. हिवाळ्यात कफ समस्या होण्याची  आणखीनच वाढते, कारण या दिवसात आपण तळलेले आणि मसालेदार पदार्थांचे सेवन जास्त करतो. तर दुसरीकडे थंडीच्या दिवसात पाणी कमी प्रमाणात पित असतो म्हणून या दिवसात ज्यांना आधीच कफ आहे त्या लोकांची समस्या वाढते.

थंडीत कफ होणे ही सामान्य समस्यांपैकी एक आहे, ज्याचा कधीकधी अनेकांना खूप त्रास होत असतो, परंतु काही लोकांना हिवाळा असो वा नसो कफाची समस्या कायम असते. यासाठी तेलकट आणि मसालेदार असलेले अन्न कमी करण्याबरोबरच चांगल्या प्रमाणात पाणी प्यावे आणि आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. अशातच या समस्येपासून तुम्हाला या काही घरगुती टिप्स कफ न होण्यापासून आराम देऊ शकतात चला तर मग जाणून घेऊयात.

कफाची समस्या दूर करण्यासाठी उपाय प्रभावी

स्वयंपाकघरात असलेल्या मसाल्यांमध्ये बडीशेप पचनासाठी खूप फायदेशीर मानली जाते. जेवण झाल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप चावून खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच कफापासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज सकाळी बडीशेपचे पाणी प्यावे. तसेच ओवा आणि जिरे समप्रमाणात घेऊन त्यात अर्ध्या प्रमाणात मेथीदाणे घ्या आणि चांगले भाजून घ्यावेत. यात थोडे काळे मीठ सुद्धा मिक्स करा. सर्व साहित्य बारीक करून पावडर तयार करून हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हे मिश्रण रोज अर्धा चमचा कोमट पाण्याबरोबर घेतल्याने त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांतच दिसू लागेल.

तीव्र कफासाठी घ्या त्रिफळा चूर्ण

कफाची समस्या कायम राहिल्यास त्यापासून आराम मिळण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे चूर्ण म्हणजे त्रिफळाचे चूर्ण याचे सेवन करा. हे तीन आयुर्वेदिक फळांची पावडर आहे जे तीव्र कफाची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. हे चूर्ण रोज कोमट पाण्यासोबत घेतल्यास लवकर आराम मिळतो. यासोबतच त्रिफळा चूर्णाचे इतरही अनेक फायदे आहेत. ज्याने तुम्ही तंदुरुस्त राहता.

पपई खाणे फायदेशीर

कफापासून सुटका मिळवण्यासाठी पिकलेल्या पपईचा आहारात समावेश करा. रोज थोडीशी पपई खाल्ल्याने अनेक पोषक तत्वे तर मिळतातच, शिवाय पपई ल्यूब्रिकेंट म्हणूनही काम करते, ज्यामुळे कफापासून सुटका होण्यास मदत होते.

अशा प्रकारे प्या दूध

रात्री आठ ते दहा मनुके पाण्यात भिजवून सकाळी त्यातील बिया काढून टाका. आता एका भांड्यात दूध घेऊन त्यात मनुके घालून दूध उकळून घ्या. हे दूध कोमट झाल्यावर प्या. रोज अशा प्रकारे दूध प्यायल्याने कफाची समस्या दूर होते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.