Health: उच्च रक्तदाब आहे आरोग्यासाठी धोक्याची घंटा, हे तीन फळं खाणे ठरते फायदेशीर

उच्च रक्तदाबामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतो. यापासून बचाव होण्यासाठी काही फळं फायदेशीर ठरतात.

Health: उच्च रक्तदाब आहे आरोग्यासाठी धोक्याची घंटा, हे तीन फळं खाणे ठरते फायदेशीर
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 9:23 AM

मुंबई, भारतात उच्च रक्तदाबाच्या (High BP) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.  याचे कारण म्हणजे बाकीच्या देशांच्या तुलनेत भारतात जास्त मीठ खाल्ले जाते. खारट पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय जे लोकं जास्त तेलकट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खातात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल (Cholesterol) जमा होऊ लागते. त्यामुळे ब्लॉकेज होऊन रक्तप्रवाहात समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत रक्ताला हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप बळ द्यावे लागते, याला उच्च रक्तदाब म्हणतात.

रक्तदाब नियंत्रित करणारी फळे

जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, कोरोनरी धमनी रोग आणि तिहेरी रक्तवाहिन्यांचे आजार यासह हृदयविकार सुरू होतात. सहसा, जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते, यामुळे स्वभाव चिडचिडा होतो. चला जाणून घेऊया तीन फळांबद्दल ज्यांचा वापर करून रक्तदाब नियंत्रित करता येतो.

केळी

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी केळी जरूर खावी, हे एक सामान्य फळ आहे आणि अनेकांना ते आवडते. या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आढळते, ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या कमी होते.

हे सुद्धा वाचा

संत्र

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण संत्री खातो, कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. संत्र्यामध्ये  लिंबूवर्गीय ऍसिड असते आणि ते रक्तदाब वाढण्यापासून प्रतिबंधित करते.

सफरचंद

सफरचंद हे अतिशय आरोग्यदायी फळ आहे, ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही’ हे आपण अनेकदा ऐकले आहे.  हे अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, तसेच रक्तदाब रुग्णांसाठी हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.