Health: ‘प्रोसेस्ड फूड’मुळे वाढतोय कर्करोगाचा धोका, याचे नेमके कारण देखील जाणून घ्या

| Updated on: Nov 29, 2022 | 11:25 AM

आहारातील चव वाढविण्यासाठी प्रोसेस्ड फूड वापरण्याकडे अनेकांचा कल असतो, मात्र यामुळे असलेल्या घटकांमुळे कर्करोगाचा धोका वाढत आहे.

Health: प्रोसेस्ड फूडमुळे वाढतोय कर्करोगाचा धोका, याचे नेमके कारण देखील जाणून घ्या
प्रक्रिया केलेले पदार्थ
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, सहजरित्या उपलब्ध असल्याने आणि जाहिरातीचा प्रभाव या कारणांमुळे पिझ्झा, बर्गर, बिस्किटे, कोल्ड ड्रिंक्स यांचे सेवन मोठ्या प्रमाणात केल्या जाते.  विविध प्रकारचे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ (Processed food) यांचे दीर्घकाळ सेवन केल्याने कोलन कॅन्सरचा (Cancer) धोका वाढू शकतो. हा आजार अनुवंशिकता, वाढते वय आणि खराब जीवनशैलीशी संबंधित आहे. नुकत्याच झालेल्या एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीची जीवनशैली दीर्घकाळ खराब राहिली तर तो या आजाराला बळी पडू शकतो.

संशोधनात अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाणाऱ्या 29 टक्के पुरुषांना हा आजार होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे. शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की, ज्या महिला बाजारात उपलब्ध असलेले प्रोसेस्ड फूड म्हणजेच तयार अन्न जास्त वापरतात त्यांच्यामध्ये कोलन कर्करोगाचा धोका 17 टक्क्यांनी वाढतो.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे काय आणि त्यामुळे कॅन्सर का होऊ शकतो

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स अशा पदार्थांना म्हणतात ज्यामध्ये असे घटक आढळतात जे आपण घरी स्वयंपाक करताना सामान्यतः वापरत नाही, जसे की रसायने आणि गोड पदार्थ, ज्यामुळे शरीराला खूप नुकसान होते. अल्ट्रा-प्रक्रिया केलेले अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न यात फरक आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये गरम करणे, गोठवणे, डाईसिंग, ज्यूसिंग यांचा समावेश होतो. प्रक्रिया केलेले अन्न तुमच्यासाठी इतके हानिकारक नाही.

हे सुद्धा वाचा

 

सामान्यतः वापरले जाणारे अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थ

  •  झटपट नूडल्स आणि सूप
  • तयार जेवण
  • पॅक केलेले स्नॅक्स
  • फिजी कोल्ड ड्रिंक्स
  • केक, बिस्किट, मिठाई
  • पिझ्झा, पास्ता, बर्गर

हे पदार्थ स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत पण त्यात भरपूर कॅलरीज असतात. या कारणास्तव, आपण भूकेपेक्षा जास्त खातो आणि नंतर वजन देखील वाढू लागते. अतिप्रक्रिया केलेले अन्न पाश्चात्य जीवनशैलीचा एक सामान्य भाग बनला आहे. सुमारे 23,000 लोकांवर केलेल्या दुसर्‍या संशोधनात, शास्त्रज्ञांना असे आढळले की अस्वास्थ्यकर आहार आणि अल्ट्रा-प्रक्रिया केलेले अन्न खाणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

अशा प्रकारे अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाला ठेवा दूर

ब्राझीलमध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड हे अतिशय सामान्य आहे आणि हवे असले तरी ते टाळता येत नाही, असा एक सामान्य समज आहे, परंतु प्रत्यक्षात ते चुकीचे आहे. वास्तविक, कोणत्याही प्रकारच्या आहारामध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न आवश्यक नसते. लोक फक्त सोयीसाठी आणि चवीनुसार त्यांचा आहारात समावेश करतात.

बहुतेक अल्ट्रा-प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांमध्ये चरबी, साखर आणि मीठ जास्त असते, तर आरोग्यासाठी आवश्यक फायबर आणि पोषक तत्वांचा अभाव असतो. जर तुम्हालाही असे अस्वास्थ्यकर अन्न टाळायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावर निर्बंध घालावे लागतील. आपण आपल्या आरोग्यासाठी पोषक अन्नपदार्थांचेचा  सेवन केले पाहिजे.