Health: हिवाळ्यात अवश्य प्यावे हळदीचे गरम दूध, जाणून घ्या फायदे

हळदीचे दूध पिणे आरोग्यसाठी हितकारक मानल्या जाते. हिवाळ्यात हळदीचे दूध पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

Health: हिवाळ्यात अवश्य प्यावे हळदीचे गरम दूध, जाणून घ्या फायदे
हळदीचे दूध Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 7:12 PM

मुंबई, भारतात हिवाळा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा काळ मानला जातो. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक पदार्थ बनविण्याचे पर्याय उपलब्ध असतात. याशिवाय  हळदीचे दूध (Turmeric Milk) भारतात शतकानुशतके प्याले जाते. विशेषतः हिवाळ्यात हळदीचे दूध पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हळदीच्या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती (Immunity power) मजबूत होते आणि शरीराला संसर्गाशी लढण्याची शक्ती मिळते. सर्दी, फ्लू, खोकला यांसारखे संसर्ग हिवाळ्यात सर्वांनाच त्रास देतात. यावर हळदीचे दूध फायदेशीर आहे.

हळदीचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत?

  1. हळदीचे दूध नैसर्गिकरित्या दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन नावाचे संयुग आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.
  2. दुधात हळद मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे हृदयविकार आणि इतर आजारांचा धोका कमी होतो.
  3. हाडांसोबतच त्वचेच्या आरोग्यासाठीही ते उत्कृष्ट असल्याचे सिद्ध होते.
  4. हळदीच्या दुधामुळे पचनाला फायदा होतो. ज्यांना लॅक्टोज असहिष्णु आहे त्यांनी बाजारात उपलब्ध हळदीच्या दुधाऐवजी घरगुती हळदीचे दूध वापरून पहावे, परंतु हे लक्षात ठेवा की ते गरमच प्यावे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. हळदीचे दूध मेंदूच्या कार्याला चालना देते. कर्क्यूमिनचा मेंदूवर होणारा परिणाम अनेक संशोधनांमध्ये दिसून आला आहे.
  7. कर्क्युमिनचा मेंदू-व्युत्पन्न न्यूरोट्रॉफिक घटक (BDNF) शी जोडला गेला आहे, कारण ते त्याचे स्तर वाढवते.  BDNF मेंदूला नवीन कनेक्शन बनविण्यात मदत करते आणि मेंदूच्या पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते.
  8. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन देखील मूड वाढवण्याचे काम करते. क्युरक्यूमिनचा प्रभाव अँटीडिप्रेसस सारखाच असतो हे अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे.

कसे बनवायचे हळदीचे दूध

हळदीचे दुःख बनविण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आपण जाणून घेऊया. यासाठी प्रथम एका भांड्यात दूध टाकून गॅसवर ठेवा आणि नंतर त्यात चिमूटभर हळद टाका. ते गरम झाल्यावर ग्लासमध्ये ओतून प्या.  या दुधात हळदीशिवाय वेलचीचे दाणे, काळी मिरी पावडर, लवंग, दालचिनी इ.ही टाकू शकता. गर्भवती महिलांनी हे दूध डॉक्टरांच्या सल्ल्याने प्यावे.

हळदीचे दूध कधी प्यावे?

हळदीचे दूध नेहमी कोमट प्यावे आणि तेही झोपण्यापूर्वी प्यावे असा सल्ला आहार तज्ज्ञांनी दिला आहे. असे मानले जाते की, हळदीचे दूध झोप येण्यास मदत करते. निद्रानाशाचा त्रास असल्यास झोपण्यापूर्वी हळदीचे कोमट दूध अवश्य प्यावे. तुम्हाला तुधाची ऍलर्जी असेल तर तुम्ही ताकात हळद घालून दूध पिऊ शकता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.