Air Pollution : वाढत्या प्रदूषणामुळे डॉक्टर देतात मास्क लावण्याचा सल्ला, कोणता मास्क सर्वोत्तम ?

दिल्लीसह मुंबईतही हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. अनेक भागात वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे अनेक प्रकारचे आजार होत आहेत. त्यांच्यामध्ये श्वसनाचे आजार अधिक दिसून येत आहेत. डॉक्टरांनी लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Air Pollution : वाढत्या प्रदूषणामुळे डॉक्टर देतात मास्क लावण्याचा सल्ला, कोणता मास्क सर्वोत्तम ?
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 2:38 PM

Air Pollution and mask : बदलत्या ऋतूनुसार वायू प्रदूषणाची पातळीही वाढू लागते. सध्या दिल्ली आणि मुंबईतदेखील हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे. काही दिवसांपूर्वी तर मुंबईतील हवेचा दर्जा दिल्लीहून अधिक खराब झाला होता. थंडीला सुरूवात होताच देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागातील AQI चा स्तर खराब होतो. त्यातच आता मुंबईतही हवेची पातळी खराब होऊ लागली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा धोका उद्भवतो. काही लोक आजारीही पडतात.

रुग्णालयांमध्ये दमा आणि ब्राँकायटिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांनी लोकांना प्रदूषण टाळण्याचा सल्ला दिला आहे. वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क घालावेत, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे मास्क आहेत. पण यापैकी कोणता मास्क चांगला आहे आणि मास्क कधी लावावा ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

डॉक्टर सांगतात की वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. विशेषत: ज्यांना आधीच अस्थमा, सीओपीडी किंवा ब्राँकायटिससारखे आजार आहेत त्यांना अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. वाढत्या प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी फिरायला न जाण्याचा प्रयत्न करावा, तसेच ज्या भागात प्रदूषणाची पातळी जास्त असेल तिथेही जाणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास मास्क घालावा, असा सल्ला डॉक्टर देतात.

मास्कमुळे काय होतं ?

प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी चांगल्या दर्जाचा मास्क वापरला पाहिजे. चांगला मास्क हा हवेतील धोकादायक कण आणि सूक्ष्म कण शरीरात जाण्यापासून रोखतो. मास्क हा बहुतांश प्रदूषण फिल्टर करतो. मास्क विकत घेताना, तो तुमच्या चेहऱ्याला कसा बसतो आणि तो तुमचे नाक आणि तोंड नीट झाकतो की नाही हे देखील तपासले पाहिजे. आपलं तोंड आणि नाक नीट झाकलं जाईल असाच मास्क खरेदी करावा.

कोणता मास्क ठरतो उत्तम ?

वायू प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी एन-95 हा मास्क सर्वोत्तम आहे. या मास्कमध्ये 5 थर असतात. हे हवेतील सुमारे 95 टक्के कण फिल्टर करते. या मास्कमुळे धोकादायक कण शरीरात जात नाहीत. त्यामुळे श्वसनाच्या समस्या टाळता येतात.

मास्क कोणी लावावा ?

वाढत्या प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी मास्क घालणे अत्यावश्यक आहे. बाहेर जाताना मास्क घालावा. नेहमी चांगल्या प्रतीचा मास्क विकत घ्यावा. आणि एकच मास्क अनेक दिवस वापरू नका, असा सल्ला डॉक्टर देतात

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.