Health: जिममध्ये केलेल्या या चुकांमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, तुम्ही देखील करत असाल या चुका तर लगेच व्हा सावध!

जिममध्ये हार्ट अटॅक येण्यामागे नेमके काय कारण आहे? हार्ट अटॅक नेमका कशामुळे येतो? हार्ट अटॅक टाळण्यासाठी या चुका टाळणे आवश्यक आहे.

Health: जिममध्ये केलेल्या या चुकांमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, तुम्ही देखील करत असाल या चुका तर लगेच व्हा सावध!
सिद्धांत वीरImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 7:24 PM

मुंबई,  प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhant veer Suryavanshi) यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी सकाळी जिममध्ये वर्कआउट (Workout) करत असताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला. यानंतर सिद्धांतला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  याआधी प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनाही जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. अनेक दिवस रुग्णालयात लढल्यानंतर राजू श्रीवास्तव जीवनाची लढाई हरले. गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका का येतो आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

हृदयविकाराचा झटका नेमका काय आहे?

हृदयविकाराचा झटका रक्ताभिसरण विकार आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत अडथळा निर्माण झाल्यास एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. काहीवेळा हृदयाच्या स्नायूंच्या एका भागामध्ये ऑक्सिजनयुक्त  रक्ताचा प्रवाह मंदावला जातो किंवा काही प्रकरणांमध्ये अवरोधित देखील होतो. अशा परिस्थितीत रक्तप्रवाह लवकरात लवकर सुरळीत न केल्यास स्नायूंमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन हृदयाचे स्नायू निकामी होऊ लागतात आणि परिणामी हृदयाचे ठोके बंद पडतात.

व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका का येतो?

कोणत्याही व्यक्तीने शारीरिक क्षमता लक्षात घेऊनच व्यायाम केला पाहिजे, कारण शरीराची विशिष्ट क्षमता असते. बऱ्याचदा  कमी शारीरिक क्षमता असूनही अनेकजण जिममध्ये जास्त व्यायाम करतात. ज्यामुळे त्यांच्या हृदयावर वाईट परिणाम होतो.

हे सुद्धा वाचा

मॅरेथॉन धावपटूंवर केलेल्या अभ्यासानुसार, जेव्हा लोक त्यांची धावण्याची स्पर्धा पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या रक्ताचे नमुने हृदयाच्या नुकसानाशी संबंधित बायोमार्कर बनतात. तथापि, ते कालांतराने स्वतःहून सावरतात. पण जेव्हा आपल्या हृदयावर सतत ताण असतो, तेव्हा हे तात्पुरते गंभीर स्वरूप धारण करतात. याशिवाय जे लोकं आधीच हृदयविकाराने त्रस्त आहेत, त्यांनाही हा त्रास होऊ शकतो.

कोणत्या लोकांना असतो हृदयविकाराचा धोका जास्त

हृदयविकाराचा धोका तुमच्या वयावरही अवलंबून असतो. असे मानले जाते की दररोज व्यायाम करणाऱ्या तरुणांना हृदयविकाराचा धोका कमी असतो, तर रोज व्यायाम करणाऱ्या वृद्धांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. मात्र गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका खूप जास्त असल्याचे दिसून येत आहे.

व्यायाम करताना ही गोष्ट टाळा

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील एका तज्ज्ञांच्या मते काही लोकं असे आहेत की जे स्नायुयुक्त शरीर तयार करण्यासाठी खूप जास्त वजन प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करतात. असे केल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, जिममध्ये गेल्यानंतर लगेचच हेवी वेट ट्रेनिंग करण्याऐवजी, प्रथम आपले ध्येय बनवा आणि हळूहळू ते लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करा.

हृदयविकाराचा धोका कसा टाळावा

जास्त व्यायाम करू नका, तंदुरुस्त राहा- आठवड्यातून काही दिवस व्यायाम केला तर ठीक आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपण सक्रिय असणे महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे डेस्क जॉब असेल तर दर 1 तासाने उठून थोडे चालावे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.