Health Tips: हिवाळ्यात राहायचे असेल फिट, तर ‘या’ पाच गोष्टी नक्की करा
हिवाळ्याच्या दिवसात आरोग्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. वातावरणातील बदलांना समोर जाण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते.
मुंबई, सध्या सगळ्यांचा आवडता ऋतू हिवाळा सुरू आहे. हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिवाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून वातावरणात झालेल्या बदलांमुळे आरोग्याच्या संबंधित तक्रारींशी लढता येईल. हिवाळ्याच्या दिवसात काही उपाय केल्यास हंगामी आजारांना दूर ठेवता येणे शक्य आहे. जाणून घेऊया या उपायांबद्दल (Winter Health Tips).
- सकस आहार घ्या: रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी निरोगी आहाराचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला आवश्यक असलेली पोषकतत्त्वे प्रथिनेयुक्त आणि कमी कार्बोहायड्रेड आहारातून येतात. निरोगु आरोग्य राखण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात उपलब्ध असलेल्या भाज्या, फळे, कडधान्य खाणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि झिंकची गरज असते. सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांमध्येही झिंक आराम देते.
- भरपूर शारीरिक हालचाली करा: शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज व्यायाम करणे. नियमितपणे व्यायाम केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि तणाव कमी होतो. तसेच, जर तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला तर तुमची यंत्रणा त्वरीत त्याच्याशी लढण्यासाठी तयार होते. रोजचा व्यायाम तुम्हाला हृदयविकारांपासूनही दूर ठेवतो.
- पुरेशी झोप घ्या: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगली झोप देखील आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेला विश्रांती आणि ताजेतवाने होण्यास वेळ मिळतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा मोबाईल, टॅब किंवा टीव्हीसारख्या इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या: पाणी हे जीवन आहे. पाणी आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते, विशेषत: जेव्हा ते रोगप्रतिकारक कार्यासाठी येते. हायड्रेशनमुळे तुमच्या शरीरात संक्रमणाशी लढा देणार्या रोगप्रतिकारक पेशींचा योग्य प्रकारे प्रसार होतो.
- तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा: धकाधकीच्या जीवनात तणाव सामान्य झाला आहे. तुम्ही ज्या तणावातून जात आहात त्याची पातळी कमी करणे ही कदाचित तुम्ही करू शकणार्या सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे. जेव्हा तुमचे शरीर सतत तणावाखाली असते, तेव्हा शरीरात अनेक नकारात्मक बदल घडत असतात. या तणावामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे संसर्गाशी लढा देणे कठीण होते.