चुकीच्या खानपान पध्दती व्यायामाचा अभाव, आहारात पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्य, नट्स आदींचा अभाव शरीरात विविध समस्यांची तसेच व्याधींची निर्मिती करीत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे बद्धकोष्ठ. (constipation) ही समस्या केवळ मोठ्या लोकांनाच नाही तर लहान मुलांनादेखील (child) मोठ प्रमाणात सतावत आहे. लहान मुलांना चुकीच्या आहाराचा सर्वाधिक त्रास होत असतो. त्याच्या आहारात (diet) अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो, ज्या त्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम करत असतात. तरीही त्याचा ते आहारात समावेश करीत असतात. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही यामुळे पोटदुखी, लठ्ठपणा आणि इतर समस्या होतात. मुलांमध्ये बद्धकोष्ठतेमुळे पोट बिघडते आणि मग त्यांना आवश्यकता नसताना औषधी घ्यावी लागत असतात. परंतु अनेकदा घरगुती उपायांनीदेखील तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करू शकतात.
पपई हे पोटांच्या विकारांसाठी रामबाण औषध मानले जाते. पपईमध्ये असलेले फायबर योग्य प्रमाणात पोटात गेले तर ते निरोगी राहते. जर तुमचे बाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्याला पपई देउ शकता. सकाळी बाळाला पपई कूस करुन किंवा नरम भाग कापून तसाच खायला दिल्यास बाळाच्या पोटाच्या सर्व समस्या दूर होतील.
लहान मुलांना दररोज प्यायला कोमट पाणी दिले तर ते केवळ त्याच्या पोटासाठीच नाही तर त्वचेसाठीही चांगले असते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. पाणी नेहमी कोमट असावे, जास्त गरम पाणी मुलांसाठी अपायकारक ठरु शकते.
आपल्या आहारात दररोज एका सफरचंदाचा समावेश असावा असे तज्ज्ञ सांगतात. सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून लांब रहा असे म्हटले जात असते. आयुर्वेदात रोज सकाळी उठल्याबरोबर एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सफरचंदात फायबर असते जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवरही याचा खूप उपयोग होतो.
अनेक वेळा असे दिसून येते की, लहान मुले एका दिवसात खूप कमी पाणी पित असतात. त्यांना वारंवार पाणी पिण्यासाठी अक्षरश: मागे लागावे लागत असते. मुले कमी पाणी पितात यामुळे त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल तर त्याला भरपूर पाणी द्या. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने केवळ पोटच नाही तर इतरही अनेक समस्या दूर होतात.
संबंधित बातम्या :
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा!
आपल्याला ‘हा’ आजार असेल तर बटाटे खाणे त्वरित थांबवावे, वाचा अधिक!
बद्धकोष्ठतेच्या समस्येला तुमच्यापासून दूर ठेवतील ‘हे’ रस, नियमित करा सेवन!