Health Tips: झोपेवर नवे संशोधन, अपुऱ्या झोपेमुळे वाढू शकतो ‘या’ आजाराचा धोका
अपुऱ्या झोपेमुळे अनेक समस्यांना समोर जावे लागू शकते. नवीन संशोधनात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे.
मुंबई, तुम्ही जर पुरेशी झोप (Quality Sleep) घेत नसाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक समस्यांना समोर जावे लागू शकते. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण पुरेशी झोप न घेतल्याने मोठ्या आजारांचा धोका असतो. एका नवीन संशोधनानुसार, माणसाच्या झोपेची गरज वाढलेली आहे. जर तुम्ही पूर्ण झोप घेत नसाल तर भविष्यात अनेक समस्यांना समोर जावे लागू शकते. चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. एका नव्या संशोधनातही ही बाब समोर आली आहे. संशोधनानुसार, पुरेशी झोप न घेतल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
अभ्यासात समोर आला हा धोका
युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांना एका अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांची झोप कमी होती त्यांना कोलेस्टेरॉल आणि जास्त वजनाची समस्या देखील होते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. ऑस्ट्रेलियातील सुमारे दहा लाख प्रौढांना टाइप 2 मधुमेह आहे. संशोधक डॉ.लिसा मॅट्रीसियानी सांगतात की, झोपेच्या विविध पैलूंचा मधुमेहाच्या जोखमीशी संबंध असतो.
या अभ्यासात, आम्ही मधुमेहाच्या जोखीम घटकांसह झोपेच्या विविध पैलूंचा संबंध तपासला. आम्हाला असे आढळून आले की, ज्यांना झोपेची समस्या होती त्यांना देखील टाइप 2 मधुमेहाचा धोका असतो. अभ्यासामध्ये 1,000 पेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन प्रौढांचे सरासरी वय 44.8 वर्षे आहे. टाइप 2 मधुमेह हा प्रामुख्याने जीवनशैलीशी संबंधित आहे आणि कालांतराने विकसित होतो.
तणावामुळे होतोय झोपेवर परिणाम
व्यस्त आणि स्पर्धात्मक युगात माणूस तणावात जगत आहे. तणावाचा परिणाम झोपेवर होत असल्याने अनेकांना अनिद्रेच्या समस्येला समोर जावे लागत आहे. तणाव दूर करण्यासाठी व्यसनांचा पर्याय निवडणे हे त्याहून धोकादायक आहे.