Health Tips: केवळ आयुर्वेदच नाही तर वैद्यकशास्त्रही ‘या’ औषधाला ‘रोगनिदाना साठी उपयुक्त मानतात; जाणून घ्या, कोणत्या आजारांमध्ये मिळतात फायदे!

आयुर्वेद ही भारतातील सर्वात प्राचीन वैद्यकीय प्रणालींपैकी एक आहे, आयुर्वेदिक औषधे अनेक प्रकारच्या रोगांवर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी मानली गेली आहेत. जाणून घ्या, कोणती औषधी वनस्पती रोगनिदानासाठी सर्वाधिक उपयुक्त मानली जाते.

Health Tips: केवळ आयुर्वेदच नाही तर वैद्यकशास्त्रही ‘या’ औषधाला 'रोगनिदाना साठी उपयुक्त मानतात; जाणून घ्या, कोणत्या आजारांमध्ये मिळतात फायदे!
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 3:05 PM

मुंबईः आयुर्वेद ही भारतातील सर्वात प्राचीन वैद्यकीय प्रणालींपैकी एक आहे, आयुर्वेदिक औषधे अनेक प्रकारच्या रोगांवर उपचार (Treatment of diseases) करण्यासाठी खूप प्रभावी जाते. वैद्यकशास्त्रालाही आयुर्वेदातील अनेक औषधी अभ्यासात अतिशय गुणकारी आणि चमत्कारिक फायदे देणारी असल्याचे आढळून आले आहे. अश्वगंधा (Ashwagandha) हे त्यापैकी एक प्रभावी औषध आहे. जे, विविध आरोग्य समस्यांवर उपचारासाठी वर्षानुवर्षे वापरले जात आहे. अश्वगंधा ही आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाची वनौषधी आहे. अश्वगंधाचे वापर हजारो वर्षांपासून तणावमुक्त करण्यासाठी (To relieve stress), ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी आणि एकाग्रता सुधारण्यासाठी केला जात आहे. अश्वगंधाविषयीच्या अभ्यासात, शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की, त्यात असंख्य प्रकारची संयुगे आहेत ज्यांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. शरीराची शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधाचे सेवन करणे तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. अश्वगंधाचे सेवन केल्याने तुम्हाला तणाव-नैराश्य यासारख्या अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्य समस्यांमध्ये विशेष फायदे मिळू शकतात.

– शारीरिक सामर्थ्यात सुधारणा

ऍथलीट्सवरील अभ्यासात असे आढळून आले आहे की अश्वगंधाचे सेवन ऍथलेटिक कामगिरीला चालना देण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. पुरुष आणि स्त्रिया यांच्यावर केलेल्या संशोधनाचे विश्लेषण असे सूचित करते की अश्वगंधा पूरक आहार शारीरिक कार्यक्षमता वाढवू शकतो, ज्यामध्ये व्यायामादरम्यान शक्ती आणि ऑक्सिजन पातळीत होणारी वाढ समाविष्ट आहे. पाच पद्धतीने केलेल्या अभ्यासाच्या विश्लेषणात असे आढळून आले की, अश्वगंधा घेतल्याने निरोगी प्रौढ आणि क्रीडापटूंमध्ये रक्तातील ऑक्सिजनची पातळी देखील सुधारते.

मानसिक आरोग्य सदस्यांमध्ये फायदे

अभ्यास दर्शविते की, अश्वगंधा काही लोकांमध्ये नैराश्यासह इतर मानसिक आरोग्य स्थितीची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करू शकते. एका अभ्यासात, संशोधकांनी स्किझोफ्रेनिया असलेल्या 66 लोकांमध्ये अश्वगंधाचे परिणाम पाहिले. त्यांना आढळले की, सहभागी ज्या रुग्णांनी 12 आठवडे दररोज 1,000 मिलिग्रॅम अश्वगंधा अर्क घेतला त्यांच्या लक्षणांमध्ये कमालीची सुधारणा झाली. या औषधाचे आश्चर्यकारक फायदे ताण-तणाव आणि चिंताग्रस्त समस्यांपासून मुक्त होण्यासाठी देखील दिसून आले आहेत.

– मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर

संशोधकांनी सुचवले आहे की, अश्वगंधाचे सेवन मधुमेहासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अश्वगंधाचे फायदे होऊ शकतात. मधुमेह असलेल्या लोकांवरील क्लिनिकल अभ्यासांसह 24 अभ्यासाच्या पुनरावलोकनात असे आढळून आले की, अश्वगंधा रक्तातील साखर, हिमोग्लोबिन A1c (HbA1c), इन्शुलिन, रक्तातील लिपिड्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र त्याचा अभ्यास मर्यादित आहे.

– प्रजनन क्षमतेत वाढ

काही अभ्यासामध्ये अश्वगंधा पूरक पुरुष प्रजनन क्षमता आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास फायदेशीर असल्याचे आढळले आहे. 40-70 वर्षे वयोगटातील पुरुषांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की याचे सेवन केल्याने थकवा येण्याची लक्षणे कमी होण्यास आणि शरीरात योग्य मात्रेत ऊर्जा राखण्यास मदत होते. अश्वगंधाच्या सेवनाने टेस्टोस्टेरॉन निर्मितीचे फायदे दिसून आले. सहभागींमध्ये टेस्टोस्टेरॉनमध्ये 14.7% अधिक वाढ झाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.