Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indigestion | वारंवार अपचनाची तक्रार? ‘या’ सोप्या उपायांनी मिळेल आराम!

बदलत्या जीवनशैलीमुळे अपचन, आंबोशी, बद्धकोष्टता, गॅस, पोटदुखीसारख्या समस्या लोकांच्या रोजच्या समस्या बनल्या आहेत.

Indigestion | वारंवार अपचनाची तक्रार? ‘या’ सोप्या उपायांनी मिळेल आराम!
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 1:32 PM

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे अपचन, आंबोशी, बद्धकोष्टता, गॅस, पोटदुखीसारख्या समस्या लोकांच्या रोजच्या समस्या बनल्या आहेत. अति-मसालेदार, तेलकट अन्न आणि उशीरा खाण्याच्या सवयी यासारख्या विविध कारणांमुळे पाचन तंत्र सामान्यत: विचलित होते आणि अशा समस्या उद्भवू लागतात. जर आपणही दररोज अशा समस्यांशी झुंज देत असाल तर, या सोप्या उपायांचा आपल्याला उपयोग होऊ शकेल (Health tips to get relief from indigestion problem).

तांब्याच्या भांड्यात पाणी प्या.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे पोटातसाठी खूप फायदाशीर ठरते. जुन्या काळात लोक बर्‍याचदा ताब्यांची भांडी वापरत. पोट हे सर्व आजारांचे मूळ कारण आहे, असा जुन्या लोकांचा विश्वास होता. जर पोट निरोगी असेल तर, सर्व काही निरोगी राहते, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच आपणही तांब्याच्या भांड्यातही पाणी पिण्याची सवय लावून घेतली पाहिजे. परंतु, ही भांडे जमिनीवर ठेवू नका. तांब्याचे भांडे ठेवण्यासाठी लाकडी टेबल किंवा फळीचा वापर करा. तरच त्याचा फायदा होईल.

आठवड्यातून एक दिवस उपवास करा.

आठवड्यातून एक दिवस उपास करण्याची सवय लावा. यामुळे आपल्या पोटाला आराम मिळतो आणि पचना संबंधित सर्व समस्या स्वतःच बऱ्या होतात. एक दिवसाचे लंघन पाचक प्रणाली नियमित करण्यासाठी फायदेशीर ठरते.

अन्न चावून खा.

बरेचदा लोक खाताना ते व्यवस्थित चर्वण करत नाहीत, जे अतिशय चुकीचे आहे. आयुर्वेदानुसार, प्रत्येक व्यक्तीने एक घास किमान 30 ते 35 वेळा चावून खाल्ला पाहिजे. यामुळे अन्नाचे सहज पचन होते आणि पाचक प्रणाली मजबूत होते (Health tips to get relief from indigestion problem).

दररोज जेवल्ल्यानंतर चालण्याची सवय लावा.

प्रत्येक व्यक्तीने वेळेवर अन्न खावे आणि खाल्ल्यानंतर, विशेषत: रात्रीच्या जेवणानंतर कमीतकमी अर्धा तास चालायला पाहिजे. याद्वारे, अन्न सहज पचते आणि पचन तंत्र सुधारते. प्रत्येक व्यक्तीने दुपारी 12 ते 2 आणि रात्री 8 ते 9 दरम्यान जेवणाच्या वेळा निश्चित कराव्यात.

योग आणि प्राणायाम पाचन तंत्राला बळकट करतात.

दररोज सकाळी योगासने आणि प्राणायाम केल्याने पाचन तंत्रातही सुधारणा होते. पचन समस्या पूर्णपणे बऱ्या करण्यासाठी आपण दररोज त्रिकोणासन, पश्चिमोत्तानासन आणि पवनमुक्तासन करावे. काही कालावधीतच आपल्याला याचे फायदे जाणवू लागतील.

खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्या.

पोटाच्या समस्या नियंत्रित करण्यासाठी कोमट पाणी देखील उपयुक्त आहे. जेवणानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी पिण्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते. तसेच, यामुळे पाचन शक्ती मजबूत करते.

(Health tips to get relief from indigestion problem)

हेही वाचा : 

कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट.
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्...
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्....
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर...
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर....
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.