Health Tips | कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर राहावं लागतंय? मग, निरोगी राहण्यासाठी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

आपण बराच काळ घराबाहेर असताना आरोग्याची काळजी घेणे जरा अधिक अवघड असते. परंतु, काही खबरदारी घेऊन काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेत, आपण ही समस्या सहजपणे सोडवू शकता.

Health Tips | कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर राहावं लागतंय? मग, निरोगी राहण्यासाठी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या...
हेल्थ टिप्स
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 7:14 AM

मुंबई : जर आपल्या कामाचे स्वरूप असे असेल की, ज्यामुळे आपल्याला बराच काळ घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणी थांबावे लागत असेल, तर आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बराच काळ घराबाहेर रहाण्याने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. याची अनेक कारणे आहेत, जसे की वेळेवर आणि पुरेसे प्रमाणात पाणी न पिणे, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे, सतत चहा-कॉफी पिणे आणि अनियमित दिनक्रम (Health Tips to take care of your body while working so far from home).

आपण बराच काळ घराबाहेर असताना आरोग्याची काळजी घेणे जरा अधिक अवघड असते. परंतु, काही खबरदारी घेऊन काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेत, आपण ही समस्या सहजपणे सोडवू शकता.

दिवसातून 3 ते 4 वेळा थोडे-थोडे खा.

आपल्या शरीरासाठी दिवसातून 3-4 वेळा पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या शरीरातील चयापचय दर सुधारण्यास मदत होते. जर आपण दररोज नियमांनुसार अन्न खात असाल आणि नंतर बर्‍याच काळासाठी अन्न सोडाल, तर त्यामुळे कॅलरी हळूहळू जळतात आणि शरीरात जास्त चरबी जमा होते. परंतु, दररोज आपण ठराविक अंतराने खात राहिलो, तर असे होण्याची शक्यता कमीच आहे. आपण दररोज 3 ते 4 तासांच्या अंतराने थोडे-थोडे अन्नपदार्थ खाऊ शकता. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

जास्त पाणी प्या.

आपल्याला नेहमीच अधिक पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ही सवय आपले वजन कमी करण्यात देखील मदत करते. इतर पेयांच्या तुलनेत, पाण्यात कॅलरी नसतात. पाणी कॅलरी जाळण्यास देखील मदत करते. जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी पाणी प्यायल्यामुळे आपली भूक देखील कमी होते. तहान शमवण्यासाठी आपण साखर असलेल्या पेयांऐवजी, पाणीही पिऊ शकता. यामुळे आपले शरीर दिवसभर हायड्रेटेड राहील (Health Tips to take care of your body while working so far from home).

नाश्ता चुकवू नका.

कामाच्या घाईमुळे काही लोक नाश्ता करत नाहीत आणि काही लोक कॅलरी कमी घेण्यासाठी देखील नाश्ता करत नाहीत. मात्र, याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळेच नेहमी अधिक अन्न खाल्ले पाहिजे. नाश्ता न केल्याने दिवसभर चिडचिड होते, आळशी व झोपेची भावना वाटते. नाश्त्यामध्ये तुम्ही ओट्स आणि पोहे देखील खाऊ शकता, हा एक निरोगी नाश्ता आहे. दलियामध्ये बीटा-ग्लूकन फायबर असतो, जो कोलेस्ट्रॉल कमी करतो. हे खाल्ल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळासाठी भरलेले राहील. ओट्स प्रमाणे, म्यूसेलीमध्ये देखील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट असतात.

रात्रीच्या वेळी हलके अन्न खा.

बहुतेक लोकांना रात्री जास्त भूक लागते. दिवसाच्या तणावामुळे रात्रीच्या वेळी लोकांना चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा परिस्थितीत आपण रात्री चपाती आणि भात भरपूर खातो, ज्यामुळे जास्त कार्ब खाल्ल्यास वजन वाढते. त्याऐवजी तुम्ही रात्रीच्या जेवणात किनुआ खाऊ शकता. किनुआ प्रथिने आणि फायबर समृद्ध आहे. किनुआमध्ये अमीनो आम्ल असतात, जे स्नायू मजबूत ठेवतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवतात.

रात्री जास्त साखर आणि मीठ असलेले पेय टाळा.

रात्रीच्या वेळी अधिक साखर आणि मीठयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने किंवा पेय प्यायल्याने मधुमेह आणि उच्चरक्तदाब होण्याचा धोका वाढतो. याचा तुमच्या त्वचेवर खूप वाईट प्रभाव पडतो आणि तुम्ही आणखी वृद्ध दिसू लागता. या पेयांऐवजी आपण कमी-सोडियमयुक्त पेयांची निवड करू शकता, जे आपले आरोग्य योग्य ठेवतील.

(Health Tips to take care of your body while working so far from home)

हेही वाचा :

Summer Drink | शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच अनेक आजारांना पळवून लावेल ‘कलिंगडाचा रस’!

Healthy Breakfast | नेहमी तंदुरुस्त राहायचंय? मग नाश्त्यात खा ‘हे’ भारतीय पदार्थ!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.