Health Tips : तुमचं वय आणि शरिरातील साखरेचं प्रमाण मॅच होतंय का? वयानुसार साखरेचं प्रमाण किती असावं? जाणून घ्या…
सध्याच्या धावपळीच्या जगात मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. करोडो लोक या आजाराने त्रस्त आहेत. तुमचं वय आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी यांचा मेळ असणं फार गरजेचं आहे. ते जर मॅच होत नसेल तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो.
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जगात मधुमेह (Sugar) ही एक सामान्य समस्या बनली आहे. करोडो लोक या आजाराने त्रस्त आहेत. तुमचं वय आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी यांचा मेळ असणं फार गरजेचं आहे. ते जर मॅच होत नसेल तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की सामान्य शरीरात वयानुसार ही पातळी काय असावी. याबद्दल तुम्हाला याबातमीमध्ये सविस्तर माहिती मिळेल. शरीरातील साखरेची पातळी आपल्या आहार आणि दैनंदिन दिनचर्येवर अवलंबून असते. तसंच वयानुसारही त्यात विविधता आढळेत. तसेच वाढत्या वयात शुगर लेव्हल वाढणे हे सामान्य आहे, पण त्यावरही नियंत्रण ठेवणे (Healthtips) आवश्यक आहे.
6-12 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?
6-12 वर्षे वयाच्या व्यक्तींना रक्तातील साखर 80 ते 180 मिलीग्रॅम असावी.जेवणानंतर ही पातळी 140 mg/dL पर्यंत जाऊ शकते तर रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 100 ते 180 mg/dl पर्यंत सामान्य मानली जाते.
13-19 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?
जर तुमचं वय 13-19 वर्षे असेल तर साखरेची पातळी 70 ते 150 mg/dl राहू शकते. दुपारच्या जेवणानंतर ते 140 mg/dL आणि रात्रीच्या जेवणानंतर 90 ते 150 mg/dL असावे.
20-26 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?
20-26 वर्षे वयोगटातील उपवास करताना साखरेची पातळी 100 ते 180 mg/dl असावी. त्याच वेळी, दुपारच्या जेवणानंतर, ते 180 mg/dL पर्यंत जाऊ शकते. रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 100 ते 140 mg/dl असावी.
27-32 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?
जर तुमचे वय 27-32 वर्षे असेल तर उपवास करताना रक्तातील साखरेची पातळी 100 mg/dl असावी. त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणानंतर ही पातळी 90-110 mg/dL पर्यंत जाऊ शकते. नंतर रात्रीच्या जेवणानंतर साखरेची पातळी 100 ते 140 mg/dl असावी.
33 ते 40 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?
33 ते 40 वयोगटातील उपवासातील साखरेची पातळी 140 mg/dl पेक्षा कमी असावी. दुपारच्या जेवणानंतर साखरेची पातळी 160 mg/dl पेक्षा कमी असली पाहिजे, तर रात्रीच्या जेवणानंतरची पातळी 90 ते 150 mg/dl असावी.
संबंधित बातम्या