Health: हिवाळ्यात लवकर उठणे आरोग्यसाठी धोकादायक, नवीन अभ्यासात आणखी काय काय समोर आले?
सकाळी लवकर उठणे प्रत्येकासाठीच हिताचे नसते. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
मुंबई, सकाळी लवकर उठणे (Waking up early) आरोग्यासाठी फायदेशीर असते असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जगातील अनेक नामवंत उद्योगपतीही सकाळी लवकर उठून आपली दिनचर्या सुरू करतात. यशाच्या शिखरावर पोहोचलेले अनेकदा त्यांच्या मुलाखतींमध्ये या दिनचर्येला त्यांच्या यशाचे मुख्य कारण मानतात, पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनात धक्कादायक खुलासा झाला आहे. संशोधनानुसार, सकाळी बळजबरीने उठल्यानेही शरीराचे अनेक नुकसान होते. विशेषत: हिवाळ्यात सकाळी लवकर उठणे हे आरोग्यासाठी काही वेळा हानिकारक ठरू शकते.
यशाचे मूल्यांकन सकाळी लवकर उठण्याशी करणे चुकीचे
सकाळी लवकर उठल्याने प्रत्येकाचं जण यशस्वी होतीलच हे आवश्यक नाही. यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टींची सांगड घालावी लागते. सहसा जगात दोन प्रकारचे लोक आढळतील. एकीकडे काही लोकं आहेत ज्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आवडते, तर दुसरीकडे असे लोकं आहेत ज्यांना सकाळी लवकर उठणे आवडते. जगात सुमारे एक चतुर्थांश लोकं आहेत ज्यांना सकाळी लवकर उठायला आवडते, तर तितक्याच लोकांना रात्री उशिरापर्यंत जाणे आवडते.
संशोधन काय सांगतं?
संशोधनानुसार जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात ते कल्पनाशक्तीच्या बाबतीत पुढे असतात आणि त्यांना एकटे राहणे अधिक आवडते. दुसरीकडे, सकाळी उठणाऱ्यांचा मूड खूप सहकार्याचा असतो. जे लोक सकाळी उठतात ते त्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घेतात.
काय आहेत सकाळी लवकर उठण्याचे तोटे?
संशोधनानुसार, बॉडी क्लॉकच्या विरोधात, जर सकाळी उठायला सांगितले किंवा रात्रीपर्यंत जागायचे म्हटले तर शरीरावर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत शरीर चांगले परिणाम देत नाही. शरीराला नैसर्गिक पद्धतीने चालवायला दिले तर त्याची कार्यक्षमता चांगली राहते. जर एखादी व्यक्ती रात्री उशिरापर्यंत जागी राहिली आणि तिला सकाळी लवकर उठण्यास सांगितले तर तिचा कामाकडे कल कमी जाणवतो. अशा लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या बळावते.