वर्किंग वुमनचा डाएट प्लान काय असतो माहीत आहे का?; वाचा डिटेल्स

नोकरदार महिलांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा लेख एक संतुलित आहार आणि फिटनेस दिनचर्या कशी तयार करावी यावर प्रकाश टाकतो. सकाळी, दुपारी आणि रात्री काय खाऊ शकतात याचा सल्ला, तसेच नियमित व्यायामाचे फायदे यावर या लेखात चर्चा केली आहे.

वर्किंग वुमनचा डाएट प्लान काय असतो माहीत आहे का?; वाचा डिटेल्स
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 6:08 PM

महिला आता प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्या उमटवत असतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीत त्यांचंही मोठं योगदान आहेत. काही महिला तर घरातील काम सांभाळून नोकरी सांभाळतात. शिवाय मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष देतात. प्रचंड एनर्जीने काम करत असतात. त्यामुळे कदी कधी त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून त्या मेहनत घेत असतात. मात्र महिलांनी थोडं शरीराकडे लक्ष दिलं तर त्यांना तब्येतही सांभाळता येऊ शकते. त्यासाठी त्यांनी डाएटवर भर द्यायला हवा.

नोकरदार महिलांनी त्यांच्या आहार आणि फिटनेसला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. योग्य आहार न घेतल्यामुळे महिलांना थकवा आणि कमजोरी अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नवी दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जर तुम्ही नोकरदा महिला असाल, तर तुम्हाला तुमच्यासाठी योग्य डाएट प्लान बनवणे खूप महत्त्वाचे आहे. डाएट प्लान तयार केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता, असं पालीवाल म्हणाल्या. नोकरदार महिलांनी एक दिवसाचा आहार घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

असा असावा नाश्ता

हे सुद्धा वाचा

नोकरदार महिलांनी सकाळी 8 ते 10 यावेळेत रोज नाश्ता करावा. नाश्त्यात तुम्ही 2 स्लाईस ब्राऊन ब्रेड किंवा ओट्स पराठा, 1 कप दूध आणि सफरचंद-बनाना ज्यूस घेऊ शकता. नाश्त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान सफरचंद, केळी, द्राक्षे किंवा थोड्या भूईमुगाच्या शेंगा किंवा बदाम खा.

दुपारचं जेवण असं असावं

दुपारी 1 वाजता नियमितपणे जेवण करण्याची सवय लावून घ्या. दुपारच्या जेवणात तुम्ही थोडा भात, 4-5 चपात्या, 1 वाटी मिक्स भाजी, दही आणि कोशिंबीर खाऊ शकता. संध्याकाळी हलका नाश्ता करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एक कप चहा किंवा कॉफी आणि बदाम खाऊ शकता.

रात्री काय खाल?

तुमचं रात्रीचं जेवण 8 ते 9 वाजेच्या दरम्यान असायला हवं. तुम्ही रात्रीचं जेवण हलकं ठेवू शकता. रात्री मटकी किंवा तूर डाळीसोबत भात खाऊ शकता. त्याशिवाय फक्त खिचडी ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. जेवण झाल्यावर अर्धा तासानंतर जायफळासोबत एक ग्लास दूध प्यायला विसरू नका. जायफळासोबत दूध प्यायल्याने चांगली झोप येते आणि तणाव कमी होतो.

तुम्ही दररोज सकाळी सुमारे अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे तुमच्या चयापचय प्रक्रियेत वेग येतो आणि त्यामुळे अन्न पचनास कोणतीही अडचण येत नाही. व्यायाम केल्यामुळे फॅटही बर्न होते, असं पालीवाल सांगतात.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.